महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पेडणे तालुकास्तरीय स्पर्धेत हरमल गावडेश्वर नाट्यासंस्थेस तृतीय पारितोषिक

01:05 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हरमल : पेडणे तालुक्यातील नाट्याकर्मी विजय तुळसकर यांनी आयोजित केलेल्या पेडणे तालुका मर्यादित कै. सौ. प्रभावती चंद्रकांत तुळसकर स्मृतीप्रित्यर्थ हौशी रंगभूमी नाट्यास्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. सदर स्पर्धेत नाट्याकर्मी विजय तुळसकर यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांचाच समावेश होता. या हौशी नाट्या 2024 या स्पर्धेत हरमल येथील श्री गावडेवंश तऊण हौशी नाट्यामंडळाने सादर केलेल्या रहस्यप्रधान नाटक ‘काहीतरी घडतंय इथं’ नाटकाला सांघिक तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. वैयक्तिक गटात उत्कृष्ट बालकलाकार आर्या अऊण गावडे, उत्कृष्ट स्त्राr अभिनय द्वितीय दिपाली राजन गावडे व उत्कृष्ट पुऊष अभिनय अजित मांजरेकरला द्वितीय बक्षीस प्राप्त झाले. नाटकात प्रकाश गावडे, महेश गोकर्णकर, सुनील गावडे, आर्या गावडे, संकेत गावडे, अऊण गावडे, अजित मांजरेकर, दिपक गावडे, महादेव गावडे, अमन गावडे, विघ्नेश गावडे व दिपाली गावडे यांनी भूमिका साकारल्या होत्या.

Advertisement

स्पर्धेच्या बक्षिसवितरण सोहळ्यात नगरसेवक माधव सिनाई देशप्रभू, नाट्याकलाकार राजू बोंद्रे, साहित्यिक आनंद नाईक आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजक नाट्याकर्मी तथा नाट्यादिग्दर्शक विजय तुळसकर यांना हरमल दुर्वांकुरच्या नाट्यास्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शनाचे द्वितीय बक्षीस प्राप्त झाले होते. हरमल दुर्वांकुर कला केंद्राच्या हरमल ग्राम मर्यादित हौशी नाट्यास्पर्धेत सदर नाटकास द्वितीय बक्षीस मिळाले. नाटकातील वैयक्तिक गटात दिपाली गावडे हिस उत्कृष्ट स्त्राr अभिनयात प्रथम बक्षीस मिळाले. बक्षिसवितरणास नाट्याकलाकार अॅड. अमित सावंत, सरपंच रजनी इब्रामपूरकर उपस्थित होते. गावडेश्वर नाट्यासंस्थेच्या कलाकार व तंत्रज्ञ मंडळाच्या घवघवीत यशाबद्दल पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article