For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत हरलीन

06:28 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत हरलीन
Advertisement

ब्रोकन बट ब्युटीफूल आणि कोहरा या वेबसीरिजमध्ये स्वत:च्या अभिनयाची जादू दाखविणारी हरलीन सेठी लवकरच आता अनुराग कश्यपच वेबसीरिज ‘बॅड कॉप’मध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये तिची भूमिका अत्यंत दमदार असेल. या सीरिजकडून हरलीनला मोठ्या अपेक्षा आहेत.

Advertisement

अभिनयाच्या क्षेत्रात संधी मिळू लागल्यावर आत्मविश्वास वाढू लागतो. असेच काहीसे हरलीन सेठी सोबत घडले आहे. बॅड कॉप या सीरिजमध्ये हरलीन पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. अशाप्रकारच्या भूमिका अनेक अभिनेत्रींनी साकारल्या आहेत. परंतु मी अन्य कुणाच्या शैलीचे अनुकरण करणार नाही. मी कुणाची नक्कल करू शकत नाही. तर केवळ त्यांच्या अभिनयामुळे प्रेरित होऊ शकते असे हरलीनने म्हटले आहे.

या सीरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारण्याचा अनुभव लार्जर दॅन लाइन प्रकारचा होता असेही तिने म्हटले आहे. बॅड कॉप ही सीरिज लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असून यात तिच्यासोबत अनुराग कश्यप आणि  गुलशन देवैया हे दिसून येणार आहेत. हरलीन हे अभिनेता विक्की कौशलची पूर्वाश्रमीची प्रेयसी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.