हरीपूरचा गजा, कोल्हापूरची भुंडा बैलजोडी शिरोळच्या शर्यतीत प्रथम
शिरोळमध्ये शर्यतीमध्ये ब गटात पप्पू पाटील, सतीश पाटील यांची बैलजोडी विजेती
कोल्हापूर
शिरोळ येथील ग्रामदैवत बुवाफन महाराज उत्सव, हजरत नुरखान बादशाह उरुसानिमित्त गुरुवारी आयोजित जनरल बैलजोडी शर्यतीमध्ये उदय जगदाळे यांच्या हरिपूरच्या गजा व कोल्हापूरच्या भुंडा या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवून 51 हजार रोख रक्कम व निशान कायम चषक पारितोषिक पटकाविले. ब गट जनरल बैलगाडी शर्यतीत गट क्रमांक एकमध्ये पप्पू पाटील आणि गट क्रमांक दोनमध्ये यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला. जनरल घोडागाडी शर्यतीत गुरु माळी यांच्या घोडागाडीने प्रथम क्रमांक फटकाविले.
येथे आयोजित गट जनरल बैलगाडी, जनरल घोडागाडी शर्यत गर्दी केली होती. शासनाच्या नियमानुसार गुरुवारी शिरोळ बैलगाडी मैदान पार पडले. गट अ जनरल बैलगाडी शर्यतीसाठी 11 बैलगाड्यांच्या नोंदी झाल्या होत्या. तर ब गट जनरल बैलगाडी शर्यतीसाठी 32 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या गटातील बैलगाड्यांच्या शर्यती दोन गटात विभागून घेण्यात आल्या. जनरल घोडागाडी शर्यतीसाठी 13 घोडागाडी सहभागी झाल्या होत्या. या सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम निशान व कायम चषक बक्षीस म्हणून देण्यात आले.
श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीचे मार्गदर्शक युवानेते पृथ्वीराजसिंह यादव, अध्यक्ष केतन चव्हाण, उपाध्यक्ष संकेत कोळी, कार्याध्यक्ष महेश काळे पंचप्रमुख रावसाहेब देसाई, संभाजीराव जगदाळे, दत्तात्रय सावंत, जयसिंग देसाई, बाळासाहेब गावडे, धनपाल कनवाडे, रामचंद्र पाटील, नायकू गावडे, धनाजी पाटील नरदेकर, रामचंद्र पाटील, संजय चव्हाण, महेश पाटील, अवधूत देसाई, सिताराम शिंदे, सूर्यकांत संकपाळ, अजित चुडमुंगे, दत्तात्रय काळे, दिलीप संकपाळ, प्रतापसिंह पाटील, किरण गावडे, ओंकार गावडे, रविराज जगदाळे, चंद्रकांत भाट, संदीप चुडमुंगे, तुषार पाटील, अर्जुन जाधव, तुषार पाटील, अजय सावंत, विकास शिंदे, आदींनी शर्यतीचे पंच म्हणून काम पाहिले.
जनरल बैलगाडी शर्यत-
प्रथम -उदय जगदाळे ( बोंद्रे सरकारचा गजा आणि महेश पाटील कोल्हापूरचा भुंडा), द्वितीय - प्रसाद उर्फ पप्पू संकपाळ (संदीप पाटील कोल्हापूरचा हरण्या आणि हर्षद बुबनाळे म्हैशाळचा बाशिंग भवरा), तृतीय- पप्पू पाटील (बोंद्रे सरकार हरिपूरचा बुलेट छब्या आणि युवराज शिंदे कोल्हापूरचा सायलेंट वशा).
ब गट जनरल बैलगाडी गट क्रमांक एक
प्रथम- पप्पू पाटील (बोंद्रे सरकार हरिपूरचा फाकड्या आणि माने रोडलाईन्स अंकले सर्जा) द्वितीय - बंडा कुटकुळे(सोनू पारेकर सलगर आणि घालवाड चिमण्या) तृतीय- स्वप्निल लठ्ठे कुची. ब जनरल बैलगाडी शर्यत गट क्रमांक दोन - प्रथम - सतीश पाटील बिसूर, द्वितीय उदय जगदाळे शिरोळ, तृतीय - सतीशआण्णा बेंद्रे.
जनरल घोडागाडी शर्यत -
प्रथम - गुरु माळी, द्वितीय - गिरीश कोळी, तृतीय - उदय जगदाळे. या सर्व विजेत्यांना बक्षीस देण्यात आली.