महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत अन् मलेशियादरम्यान हरिमाऊ शक्ती युद्धाभ्यास

06:24 AM Dec 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्वालांलपूर येथे आजपासून प्रारंभ

Advertisement

वृत्तसंस्था/ क्वालांलपूर

Advertisement

भारत आणि मलेशिया यांच्यात 2 डिसेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत संयुक्त सैन्याभ्यास आयोजित होणार आहे. युद्धाभ्यास मलेशियाची राजधानी क्वालांलपूरच्या बेंटोंग कॅम्पमध्ये आयोजित होणार आहे. या युद्धाभ्यासाला हरिमाऊ शक्ति-2024 हे नाव देण्यात आले आहे. भारत आणि मलेशिया यांच्यात सैन्यपातळीवर संबंध वृद्धींगत होत आहेत. दोन्ही देशांमधील सैन्य भागीदारीचे प्रतीक हा युद्धाभ्यास ठरला आहे.

मागील वर्षी हा युद्धाभ्यास भारतातील मेघालय येथील उमरोई छावणीत पार पडला होता. यात मलेशियन सैन्याची 5 वी रॉयल बटालियन आणि भारताच्या राजपूत रेजिमेंटच्या एका बटालियनने भाग घेतला होता. याचबरोबर भारतीय सैन्य आणि सिंगापूर आर्म्ड फोर्सेसदरमयन अग्नि योद्धा सैन्य अभ्यास 30 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाला आहे.  तीन दिवसांपर्यंत चाललेल्या या युद्धाभ्यासात सिंगापूर आर्टिलरीच्या 182 आणि भारतीय सैन्याच्या आर्टिलरी रेजिमेंटच्या 114 सैनिकांनी भाग घेतला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article