हरी परब 'स्पिरीट ऑफ दी डिसेबल' पुरस्काराने सन्मानित
कुडाळ / वार्ताहर
कुडाळ तालुक्यातील केरवडे तर्फ माणगाव ( भोईचे केरवडे ) येथील सुपुत्र व दिव्यांग बांधव हरी दत्ताराम परब यांना राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाऊंडेशनतर्फे दिला जाणाऱ्या 'स्पिरीट ऑफ दी डिसेबल' या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुडाळ येथील जगन्नाथ म्युझिकल येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. हरी परब अंध असूनही भजन, दशावतार कलेचीही आवड आहे. भजनात कोरस म्हणून ते साथ करतात. आहे.आधुनिकीकरणामुळे अलिकडच्या काळात पुरातन वस्तू दुर्मीळ झाल्या आहेत. नवीन पिढीला त्या वस्तूंची ओळख व्हावी. त्यांचे जतन व्हावे आणि त्या. वस्तूंची ओळख नवीन पिढीला व्हावी, याच उद्देशाने त्यांनी जवळपास 300 वस्तूंचा संग्रह केला आहे. दिव्यांग (अंध) असूनही त्यांनी मेहनतीतून या वस्तू जोपासत ही गोष्ट साध्य केली आहे. ती चित्रकार असूनही पूर्वी त्यांनी अनेक चित्रे रेखाटली आहेत. दिव्यांग असूनही ते अन्य दिव्यांग बांधवांना सोयी सुविधा मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत असतात.समाजातील या वंचित घटकांसाठी ते झोकून काम करतात.पुरातन वस्तूंचा संग्रह आणि त्यांच्या या सामाजिक उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाऊंडेशन ( कडगाव, गडहिंग्लज - कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्पिरीट ऑफ दी डिसेबल' 2025 - 26 हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या संस्थेच्यावतीने कुडाळ येथील जगन्नाथ म्युझिकल येथे ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन ( कडगाव ) या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती शारदा आबाजी पाटील, संस्थापक बाळासाहेब पाटील, सदानंद पाटील आदींनी हरी परब यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. संदिप केरवडेकर, धनंजय सावंत, प्रणव परब, बाळकृष्ण परब उपस्थित होते. शाल ,सन्मानचिन्ह सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन श्री परब यांना सन्मानित करण्यात आले. श्री परब यांचे कार्य कौतुकास्पद तसेच समाजातील अन्य दिव्यांग बांधवांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार बाळाजी पाटील यांनी काढले. दरम्यान , आपण जे कार्य करीत आहे.भजन कलेची आवड जोपासत आहे.या आपल्या यशाच्या वाटचालीत पखवाज विशारद डॉ. दादा परब, संदीप केरवडेकर व मित्रपरिवाराचे सहकार्य मिळत आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच आपणाला ही ऊर्जा मिळते, असे हरी परब यांनी सांगितले.