For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कष्टाळू शेतकऱ्यांच्या घामाचे दाम वाया जाऊ देणार नाही!

10:22 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
कष्टाळू शेतकऱ्यांच्या घामाचे दाम वाया जाऊ देणार नाही
Advertisement

माजी आमदार अरविंद पाटील यांचे प्रतिपादन : गुंजी प्राथमिक कृषी सहकारी संघाचा अमृतमहोत्सव, नूतन इमारतीचे उद्घाटन

Advertisement

वार्ताहर /गुंजी

गरीब कष्टाळू शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून घाम गाळून जमवलेल्या पैशांचा योग्यरितीने सदुपयोग करून सोसायटी बरोबरच शेतकऱ्यांचा विकास साधला जाईल, असे प्रतिपादन गुंजी येथील विविधोद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संघाचा अमृतमहोत्सव व नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार व बी.डी.सी.सी. बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन व संचालक सतीश कुलकर्णी होते. ते पुढे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गुंजी कृषी पत्तीन संघाने नियोजनबद्ध कामगिरी केल्यामुळे त्यांना या क्षेत्रात भरारी मारता आली. त्यांचे हे प्रयत्न पाहून आणि अमृतमहोत्सवासाठी आपण कोरोना काळाची तमा न बाळगता या सोसायटीसाठी नाबार्डकडून 60 लाखांचे अनुदान मिळवून दिले. त्यामुळेच आज या सोसायटीचा कायापालट झालेला आपणास दिसून येत आहे. त्यास येथील प्रामाणिक आणि कष्टाळू शेतकऱ्यांचे श्रेयही कारणीभूत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement

सुरुवातीस कित्तूर मतदारसंघाचे माजी आमदार महांतेश दो•गौडर यांच्या हस्ते फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तर रयत भवनाचे उद्घाटन माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते, नामफलकाचे अनावरण भाजपा नेते व उद्योगपती शरद केशकामत, काऊंटरचे उद्घाटन एसीएफ एस. एस. निंगाणी तर मिटींग हॉलचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दीपक देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागतगीत व ईशस्तवनानंतर स्वागताध्यक्ष व सोसायटीचे चेअरमन प्रकाश गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गुंजीतील प्रतिष्ठित नागरिक व आयडीबीआय बँकेचे निवृत्त उपमहाव्यवस्थापक राजाराम देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कृषी संघाचे व्यवस्थापक मल्हारी करंबळकर यांच्या प्रास्ताविकानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी राजाराम देसाई, काटवा सिमेंटचे निवृत्त सीईओ प्रेमानंद गुरव, सातेरी माउली सोसायटीचे चेअरमन खेम्माण्णा घाडी, महांतेश दोडगौडर, खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल आदींची भाषणे झाली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांबरोबरच इमारत बांधकामासाठी सहकार्य केलेल्या अनेकांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर पंचक्रोशीतील विविध संघ सोसायटीच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे उपाध्यक्ष गजानन पवार, गुंजी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष संतोष गुरव, अॅड. एम. ए पाटील, जोतिबा रेमाणी, मोहनराव केशकामत, किसन चौधरी, गुंजी सेक्शन फॉरेस्टर राजू पवार, पी. एच. पाटील, नंदगड प्राथमिक कृषी संघाचे सर्व संचालक मंडळ माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद, भागधारक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक गुंडू करंबळकर यांनी तर आभार मल्हारी करंबळकर यांनी मानले.

Advertisement
Tags :

.