For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक अव्वल!

06:22 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक अव्वल
Advertisement

आयसीसी टी 20 क्रमवारी : लंकेचा हसरंगा दुसऱ्या तर ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस तिसऱ्या स्थानी  

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसी टी-20 वर्ल्डकपची फायनल ओव्हर, प्रतिस्पर्धी संघ असलेल्या दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज आणि फलंदाजीला डेव्हिड मिलर सारखा धोकादायक फलंदाज, अशा कठीण परिस्थितीत गोलंदाजी करून संघाला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला आयसीसीकडून मोठे बक्षीस मिळाले आहे. आयसीसीने वर्ल्डकपनंतर ताजी टी 20 क्रमवारी जाहीर केली. ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत हार्दिकने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. हार्दिकने श्रीलंकेच्या वहिंदू हसरंगाला मागे टाकले. टॉप-20 मध्ये हार्दिक वगळता अक्षर पटेल 12 व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, हार्दिक आंतराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थान गाठणारा पहिला भारतीय अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.

Advertisement

टी 20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी हार्दिक ऑऊट ऑफ फॉर्म होता. आयपीएलमध्ये हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. यामुळे त्याला खूप ट्रोल करण्यात आले. परंतु, टी 20 विश्वचषकात त्याने आपली क्षमता दाखवून देत टीकाकारांच्या तोंडाला कुलूप लावले. वर्ल्डकपमधील प्रभावी कामगिरीच्या जोरावर हार्दिकने लंकेच्या वहिंदू हसरंगाला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले आहे. अर्थात, टी 20 क्रमवारीमध्ये रोहित, विराट व बुमराह यांनी अव्वलस्थान पटकावले आहे पण अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत एखाद्या भारतीयाने असा कारनामा प्रथमच केला आहे. हार्दिक श्रीलंकेचा वानिंदु हसरंगासोबत संयुक्तपणे अष्टपैलूंच्या यादीत प्रथम स्थानी आहे. हार्दिक आणि हसरंगा यांना 222 रेटिंग गुण मिळाले आहेत. या यादीत तिस्रया क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्क स्टॉयनिस आहे. झिम्बाब्वेचा सिकंदर रजा चौथ्या स्थानी, बांगलादेशचा शाकीब अल हसन पाचव्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजी क्रमवारीत भारतीयांचा दबदबा

गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराहने 12 स्थानांची झेप घेतली असून तो सध्या 12 व्या स्थानावर पोहोचला आहे. या संपूर्ण स्पर्धेत जसप्रीत बुमराहने शानदार कामगिरी साकारली. याशिवाय, फिरकीपटू कुलदीप यादव क्रमवारीत आठव्या क्रमांकावर आहे. अक्षर पटेल सातव्या स्थानी असून अर्शदीप सिंग 13 व्या स्थानी आहे. गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडचा आदिल रशीद पहिल्या स्थानावर कायम आहे.

फलंदाजीत सुर्या दुसऱ्या स्थानी

आयसीसीच्या फलंदाजी क्रमवारीत ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रेव्हिस हेडने पहिले स्थान कायम राखले आहे. भारताचा सुर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानी असून इंग्लंडचा फिल सॉल्ट तिसऱ्या, पाकिस्तानचा बाबर आझम चौथ्या स्थानी आहे. याशिवाय, टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने सातवे स्थान कायम राखले आहे.

Advertisement
Tags :

.