हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्सला रामराम! मुंबई इंडीयन्सकडून स्वागत
हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सने मुक्त केले असून त्यासंबंधीचे ट्विट गुजरात टायटनच्या आयपीएल फ्रँचायझीने आज सोमवारी केले आहे. या ट्विटमध्ये लिहताना गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्याला शुभेच्छा देताना म्हटले आहे कि, " गुडबाय हार्दिक, तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा." असा संदेश लिहिला आहे, तसेच "प्रिय हार्दिक, तुझ्या आठवणींसाठी धन्यवाद. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो." अशाही भावना व्यक्त केल्या आहेत.
पुर्वीचा मुंबई इंडियन्सचा खंदा माजी अष्टपैलू खेळाडू समजला जाणारा हार्दिक पांड्याच्या बदल्यात15 कोटी रुपयांचा व्यवहार मुंबई इंडियन्स च्या फ्रँचायजींनी केला असून पंड्याचा आयपीएल मधील पगार तसेच त्याचे हस्तांतरण शुल्काचा समावेश आहे.
या हस्तांतरानंतर हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सकडून लिलावात खरेदी झाल्याचा जूना व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत त्याचा एक धडाकेबाज नवखा खेळाडू ते यशस्वी अष्टपैलू खेळाडू बनण्याचा प्रवास आणि या प्रवासाला मुंबई इंडियन्सने कसा आकार दिला हे दाखवले आहे. व्हिडीओ पोस्ट करताना हार्दिकने लिहिले आहे कि "या हस्तांतरणामुळे चांगल्या आठवणी परत आल्या.
मुंबई...वानखेडे...फलटण. मुंबईच्या टिममध्ये परत आल्याने खुपचे आनंद झाला आहे. #OneFamily." अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यावर हार्दिक पांड्याचा व्हिडियो रिट्विट करताना मुंबई इंडियन्स टिमने "घरी परत आपले स्वागत आहे." असे लिहले आहे. हार्दिक पांड्या मुंबईच्या टिममध्ये जाणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर बऱ्याच दिवसापासून फिरत होत्या. हार्दिकने गुजरात टायटन्स सोडल्यानंतर शुभमन गिलची गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली असून तो आयपीएल 2024 पासून नेतृत्व करेल.