Sangli Crime | जुन्या वादाचा राग मनात; काठ्या-कुऱ्हाडी घेऊन घरात घुसले, एकावर खुनी हल्ला!
तासगाव : शेणखताच्याखरेदी-विक्रीवरून झालेल्या जुन्या बादाचा राग मनात धरून एकावर घरात घुसून खुनी हल्ला केल्याप्रकरणी बारा जणांविरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुजाता सचिन मंडले यांनी याबाबत तक्रार दिली आहे. दरम्यान, या प्रकरणात धनाजी मंडले, रोहित मंडले, राहुल मंडले, अनिकेत मंडले आणि निखिल मंडले, या पाच जणांना तासगाव पोलिसांनी ताब्यात
घेतले आहे.
यामध्ये नेताजी मंडले, अनमोल मंडले, रोहित मंडले, राहुल मंडले, निखिल मंडले, अनिकेत मंडले, धनाजी मंडले, संदीप मंडले, दुर्गा मंडले, नयना मंडले, गौरी मंडले व शारदा मंडले सर्व रा. कौलगे यांचा समावेश आहे.तक्रारीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बसंत मंडले वैरण घेऊन घराजवळ आले. नेताजी धोंडीराम मंडले व अनमोल मंडले यांनी त्यांना अडवून 'सचिन कुठे आहे?' अशी विचारणा करतलाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यानंतर बरील बाराजण हे काठ्या व कुऱ्हाडी घेऊन घरात आले व त्यांनी सचिन मंडले यांना ओढत घराबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सचिन यांनी पंचायतमध्ये बसून वाद मिटवू, असे सांगितले. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुजाता मंडले यांना अनमोल मंडले यांनी बाजूला ढकलले व कुऱ्हाडीने सचिन यांच्या डोक्यात बार केला. तर महिलांनी सुजाता यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.