For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : सांगलीत वसुलीसाठी सावकाराने घरात घुसून दमदाटी

05:12 PM Jan 09, 2026 IST | NEETA POTDAR
sangli   सांगलीत वसुलीसाठी सावकाराने घरात घुसून दमदाटी
Advertisement

                          पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू

Advertisement

सांगली : महिना ५ टक्के व्याजाने घेतलेल्या २५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी शिवीगाळ करीत घरात घुसून एका खाजगी सावकाराने दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच घरातील एका महिलेचा संशयिताने विनयभंग केला. याप्रकरणी शुभदा प्रमोद पाटील (वय ६२, रा. राजमाने हौसिंग सोसायटी, यशवंतनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जिनेंद्र पाटील (रा. दुधगाव, ता. मिरज) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती अशी, फिर्यादी शुभदा पाटील या बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी संशयित जिनेंद्र पाटील याच्याकडून महिना ५ टक्के व्याजाने २५ लाख रुपये घेतले होते. या बदल्यात फिर्यादी शुभदा यांनी चार महिन्याचे व्याज असलेला ५ लाखाचा धनादेश पाटील यांना दिला होता.

सदर धनादेश जिनेंद्र पाटील याने वटवून रक्कम परस्पर काढून घेतली. यानंतर मंगळवारी संशयित जिनेंद्र पाटील हा चारचाकीतून (क्र. एमएच ०९ डीए ४१०८) फिर्यादी शुभदा पाटील यांच्या घरासमोर आला. अंगणातून त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. माझे घेतलेले पैसे द्या किंवा मला व्याज द्या असा हेका त्याने लावला.

Advertisement

यावेळी शुभदा यांनी घराबाहेर येवून त्यास, आता माझा मुलगा ओंकार हा आवरत आहे तर पती आणि दुसरा मुलगा बाहेर गेल्याने पाच मिनिटे थांबण्यास सांगितले. याचा राग आल्याने संशयित जिनेंद्र हा त्याचा मित्र सुजित साजणे याच्या समवेत घराचा दरवाजा उघडून आत येवून बसला. त्यानंतर त्याने शिवीगाळ करीत तुमचे घर विकून मला व्याजाचे पैसे देण्याची मागणी केली. त्याने घरातील एका महिलेचा विनयभंग केल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.