राज्यात सर्वत्र हर हर महादेव...
पहाटेपासून महाशिवरात्रीची पर्वणी सुरु : शिवलिंगावर अभिषेक करण्यास गर्दी,धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
पणजी : राज्यात आज महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. संपूर्ण राज्यभरात विविध मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचा महोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यंदा महाशिवरात्रीच्या विशेष दिवशी भाविकांना एक अनोखी पर्वणी मिळणार असून, उत्सवाच्या निमित्ताने विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यकम, विशेष पूजा आणि साधना आयोजित केली जात आहे.
जुने गोवे ब्रह्मपुरी येथील श्री गोमंतेश्वर संस्थान, नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर, अस्नोडा कैलासनगर येथील श्री देव महेश्वर मंदिर, म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थान, पारोडा पर्वत येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थान, शिरोडा शिवनाथी येथील शिवनाथ मंदिर, बोरी येथील सिद्धनाथ पर्वत मंदिर, मुरगांव ऊमडावाडा येथील श्री ऊमडेश्वर देवस्थान, सावईवेरे येथील श्री अनंत देवस्थान, खांडेपार येथील श्री व्याघ्रेश्वर महादेव देवस्थान, हरवळे येथील श्री ऊद्रेश्वर देवस्थान, सांखळी सुर्ल येथील श्री सिद्धेश्वर मंदिर, म्हापसा गंगानगर खोर्ली येथील श्री देव गंगामहेश्वर शिवलिंग संस्थान व आदी गोव्यातील प्रमुख मंदिरांमध्ये यावेळी भाविकांना महाभिषेकाचा आणि लघुऊद्राचा लाभ मिळणार आहे. यासोबतच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून, त्यात संगीत, नृत्य आणि शास्त्राrय नाट्याप्रयोग यांचा समावेश असणार आहे.
गोव्यातील अनेक प्रमुख मंदिरांमध्ये महाशिवरात्री उत्सवानिमित्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडाप्रकारांच्या आयोजनामुळे भाविक आणि पर्यटकांना आनंद मिळणार आहे. तसेच, महाशिवरात्रीला सांस्कृतिक कार्यकमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील कलाकार, नृत्यकार, आणि संगीतकार विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची सादरीकरणे करणार आहेत. यामध्ये शास्त्राrय नृत्य, भजन संध्या आणि नाट्याप्रयोगांचा समावेश असणार आहे, ज्यामुळे या उत्सवात धार्मिक आणि सांस्कृतिक रंगांची विविधता दिसून येईल.
अनेक मंदिरांमध्ये सजावट करण्यात आली आहे. महाशिवरात्रीसाठी राज्यभरात भाविक उत्साहित असून, प्रत्येक मंदिर परिसरात विशेष भक्तिरंग दिसून येत आहे. श्रद्धा आणि भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या या पवित्र दिवशी गोव्यातील अनेक मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे.