हॅप्पी बर्थडे विराट कोहली!
क्रिकेटच्या देवाने या भूतलावर काही खेळाडू स्पेशल पाठवलेत. विराट प्रेमनाथ कोहली हे त्यापैकीच एक नाव. याच महान खेळाडूचा आज वाढदिवस. सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मुंबईप्रमाणे दिल्ली हे कधीही न झोपणारे शहर. याच शहरात सरोज प्रेमनाथ कोहली या मातेने विराट नावाचं आपल्या कुटुंबात तिसर अपत्य जन्मास घातलं. हेच बाळ भविष्यात सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकरनंतर भारतीय क्रिकेटसाठी पर्याय बनेल, याचा कोणीही अंदाज बांधला नव्हता. विराटने आपल्या हातात पहिली बॅट घेतली ती तिसऱ्या वर्षी. तीच बॅट वयाच्या 38 व्या वर्षी आजही मैदानात दिमाखाने उंचावते.
विराटसारख्या महान खेळाडूसाठी देवाने त्याच्या कारकीर्दीत एक व्यवस्थित साचा निर्माण केला होता. 2008 मध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचे नेतृत्व करताना त्याची अचाट कामगिरी सर्वांचे लक्ष वेधून गेली. विश्वचषक जिंकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आणि चैतन्य होते, ते आजही जसेच्या तसे टिकून आहे. त्यानंतर 2011 च्या विश्वचषक स्पर्धेत लंकेविरुद्ध अंतिम सामन्यात सेहवाग आणि सचिनच्या सुरुवातीच्या पडझडीनंतर विराट कोहलीच्या 35 धावा या गंभीरच्या 97 आणि धोनीच्या 91 धावाएवढ्या बहुमूल्य होत्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पन्नाशी गाठल्यानंतर त्याचं रूपांतर 100 मध्ये कसं करावं, हे फक्त विराटकडूनचं शिकावं. धावांचा भुकेलेला हा खेळाडू. त्याच्यासाठी पहिली धाव आणि शंभरावी धाव एकसारखीच. 50 षटकांच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना अशक्य हा शब्द भारतीय संघाच्या शब्दकोशातच नव्हता. अर्थात त्याचं कारण होतं विराट कोहली. विराटने खिसा जरी झटकला तरी करोड रुपये बाहेर पडतील, पण यामागे त्याचा त्याग आपण नजरअंदाज करू शकत नाही. 2018 नंतर त्याने आपल्या आहारात कमालीचा बदल केला. चिकन आणि मटण यांना आपल्या आहारात त्याने नारळ दिला. ही गोष्ट तेवढी सोपी नाही.
सफेद चेंडूनंतर लाल चेंडूवर सुद्धा विराटने कमालीचं प्रभुत्व राखलं. विराट कोहलीचा कव्हरड्राईव्ह हा भारतीय क्रिकेटसाठी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ट्रेड मार्क फटका ठरला. विराट कोहली सद्यस्थितीत निवृत्तीपासून साधारणत: एक पाऊल मागे आहे. परंतु आजही प्रत्येक सामन्यात त्याची रनिंग बिटवीन द विकेट तरुणाईला लाजवण्यासारखीच आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत 11 डावात 765 धावा जमवल्या. त्यात त्याची तीन शतके आणि सहा अर्धशतकं होती. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक धावा जमवण्याचा विक्रम हा त्याच्याच नावावर आहे. विराटच्या पूर्ण कारकिर्दीत टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धचा सामना कोण बरं विसरणार. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाच्या काळात 2014 ते 2022 पर्यंत त्याची कामगिरी ही निश्चितचं असामान्य होती. कोहलीच्या नेतृत्वात 68 कसोटी सामन्यापैकी 40 सामन्यात विजय मिळवला. हे विजय कोणत्याही भारतीय
