महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुख आणि दु:ख

06:34 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिनमेकं शशी पूर्ण: क्षीणस्तु बहुवासरान् ।

Advertisement

सुखाद्दु:खं सुराणामप्यधिकं का कथा नृणाम् ।।

Advertisement

अर्थ-महिन्यातून फक्त पौर्णिमेच्या एका दिवशी चंद्राचे पूर्ण बिंब असते आणि इतर सर्व दिवस ते क्षीण झालेले दिसते. म्हणजे देवालासुद्धा सुखापेक्षा दु:खच जास्त असते तर माणसांची काय कथा?

जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बिल गेट्स ज्यांना गुरु मानतो त्यांची ही कथा. प्रचंड पैसे मिळवल्यानंतर या माणसाला एक दिवस एकाएकी त्रास झाल्यामुळे दवाखान्यात नेल्यावर कळलं की तो काही दिवसांचा सोबती आहे. त्याच काळात विवेकानंद अमेरिकेत वास्तव्याला होते. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी या माणसाला, जवळ असलेली सर्व संपत्ती दान करायला सांगितली. सुरुवातीला त्याला ते पटले नाही परंतु जसजसे पटत गेले तसतसा त्याचा दु:खाचा भार कमी होत गेला आणि मग त्याच्या लक्षात आलं की सगळं असूनसुद्धा दु:खी असणारी माणसं इथे अस्तित्वात आहेत. मग दु:ख आपण कशाचं मानायचं? आणि दु:खाबद्दल चिंता तरी कोणाजवळ व्यक्त करायची. आकाशात तळपणारा चंद्रदेखील जेमतेम एक रात्र पूर्णत्वाने उगवू शकतो. आपण तर स्वत:ला सर्व सत्ताधीश होऊनसुद्धा एक दिवसही टिकू शकत नाही. कारण माणूस नेहमी, दुसऱ्याच्या दु:खाची मोजदाद करत जगत असतो. अन् स्वत:च्या दु:खाचं व्यवस्थापन करत असतो. सकाळी झोपेतून उठल्यावर आज आपला नेमका कोणता अवयव दुखतोय हे सर्वात प्रथम तो शोधून काढतो आणि त्याबद्दल दिवसभर फक्त विचार करतो. सगळ्यांशी चर्चा करतो आणि सतत आपण किती दु:खात आहोत याचा बाजार मांडतो. अशा वेळेला आपलं दु:ख आपणच बघत हिंडत असतो. त्यापेक्षा दुसऱ्यांचे दु:ख बघायला लागलं की मग लक्षात येतं की त्यापुढे आपले दु:ख काहीच नाही. ‘दुनिया मे कितना गम है, मेरा गम कितना कम है’ याची जाणीव त्यावेळेला होऊन जाते. इतका देखणा शितल चंद्रदेखील एक दिवस उगवून महिनाभर दिसेनासा होतो. सगळ्या जगाला चालवणारा सूर्यदेखील जेमतेम अर्धा दिवस धावत पळत काम करून संध्याकाळी डोंगराआड दिसेनासा होतो. निसर्गातल्या इतक्या मोठ्या परब्रम्हाची ही कथा तर तुम्ही आम्ही सामान्य माणसं ‘किस झाड की पत्ती’ आमचं जेवढं पद मोठं होतं, आमच्या पगारावरची शून्य जशी वाढायला लागतात तशी आमच्या दु:खाची सीमा विस्तारायला लागते आणि आनंदाची कमी व्हायला लागते.

आम्ही आमच्या अवतीभोवती असलेल्या निसर्ग, प्राणी-पक्षी पाहिलं की लक्षात येतं ही मंडळी कोणालाही दाखवण्यासाठी किंवा दिखावा करण्यासाठी जन्माला आलेलीच नसतात. भगवंतांनी त्यांना जन्माला घातलं म्हणून जन्मतात आणि यथावकाश त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार निघून जातात, मृत्युला पावतात. जन्माचा आनंद नाही की मृत्यूचे दु:ख नाही, अशी परमयोगी असलेली ही माणसं आनंदाच्या राज्याचे सार्वभौम अधिकारी असतात. आम्ही मात्र दु:खाचे अधिपती ठरतो.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article