For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हनुमंत सुतार यांना कथामाला मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान

05:05 PM Jan 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
हनुमंत सुतार यांना कथामाला मालवणचा सेवामयी शिक्षक पुरस्कार प्रदान
Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, शाखा मालवण यांच्या वतीने दिला जाणारा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार जि.प. केंद्रशाळा खांबाळे नं. १, ता. वैभववाडी या शाळेतील उपशिक्षक श्री. हनुमंत तुकाराम सुतार यांना आचरे येथे विशेष कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रशाळा खांबाळे नं.१ या शाळेतील कथामालेच्या विविध उपक्रमांसाठी या शाळेची आदर्श कथामाला शाळा म्हणून निवड करण्यात आली. त्यांना कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पेडणेकर म्हणाले की "सेवामयी पुरस्कार या नावातच विद्यार्थी, शाळा, समाज यांची नि:स्वार्थी सेवा आहे. साने गुरुजींच्या तत्वांवर चालवून शाळा समाजात व समाज शाळेपर्यंत येण्यासाठी धडपडत रहा. सुतार सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक करीत असलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. पांडुरंग कोचरेकर यांनी सुतार यांच्या कार्याचा परिचय करून दिला. उपशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र आंगणे याने विशेष संदेशाद्वारे श्री. सुतार यांचे अभिनंदन केले. गुरुनाथ ताम्हणकर यांनी कथामाला मालवणच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

Advertisement

कार्यक्रमाचे उद्घाटन कै. जी. टी. गावकर आप्तेष्ट, कोकण व कोल्हापूर मित्रमंडळ अजयकुमार वराडकर, मोहन गावकर, राजू दुखंडे, कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी व्यासपीठावर निवड समिती अध्यक्ष सदानंद कांबळी, मुख्याध्यापिका शेट्ये, यशवंत कांबळी, व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रियांका पवार, अरविंद गावकर कुटुंबीय उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना श्री. हनुमंत सुतार म्हणाले, "कथामाला उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्यांची जोपासना होण्यास फार मदत झाली. शाळेतील सर्व शिक्षकांच्या एकत्रित कार्यामुळे विविध उपक्रमांमध्ये यश मिळत असते. त्यासाठी कथामाला मालवणने केलेले कौतुक प्रेरणादायी आहे. यावेळी दत्तात्रय हिर्लेकर गुरुजी, अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, पडवळ, माधव गावकर, चंद्रशेखर धानजी, त्रिंबक आजगावकर, चंद्रशेखर हडप, भानू तळगावकर, विजय चौकेकर, स्मिता जोशी, श्रृती गोगटे, अमृता मांजरेकर, संजय परब, मनाली फाटक, देवयानी आजगावकर, रश्मी आंगणे, उज्वला धानजी, गिरीधर पुजारे, भावना मुणगेकर, कामिनी ढेकणे, रसिका तेंडोलकर, परशुराम गुरव, तेजल ताम्हणकर, आचरे नं. १ शाळेच्या शिक्षक, सायली परब, आदी कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते. रामचंद्र कुबल यांनी सूत्रसंचालन केले तर सुगंधा गुरव यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.