हनुमाननगर रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ
11:10 AM Nov 07, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : क्लबरोड सर्कल ते हनुमाननगर व हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ बुधवारी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांनी केला. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून बांधकाम खात्याच्या निधीतून 4 कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. या कामाचा शुभारंभ बुधवारी झाला. माध्यमांशी बोलताना राजू सेठ म्हणाले, 8 वर्षांपूर्वी आमदार फिरोज सेठ यांनी रस्त्याचे काम केले होते. त्यानंतर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बांधकाम खात्याच्या मंजूर अनुदानातून रस्त्याचा विकास केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक संदीप जिरगीहाल, अमन सेठ, माजी नगरसेविका अनुश्री देशपांडे, दिनेश देशपांडे, राहुल मेत्री, सलीम खतीब यासह सार्वजनिक बांधकाम खाते व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article