For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कातवड येथे हनुमान जयंती उत्सव

03:17 PM Mar 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
कातवड येथे हनुमान जयंती उत्सव
Advertisement

१,२ एप्रिलला धार्मिक ,सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मालवण | प्रतिनिधी

मालवण कांदळगाव कातवड येथील पांडव कालीन तळी येथील श्री हनुमान मंदिरात १ ते २ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.श्री हनुमान जन्मोत्सवा निमित्त १ एप्रिल रोजी जागर उत्सवा होणार असून या निमित्त रात्रौ ९ वाजता श्री देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ कारीवडे यांचा "गणबिंदू घुबड" हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.तर २ एप्रिल रोजी पहाटे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा आहे. विधीवत पूजन, सकाळी १० वाजता श्री स्वामी कृपा महिला भजन मंडळ बुवा तन्वी बागवे यांचे संगीत भजन होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन बागवे कुटुंबियांच्या वतीने करण्यात येत आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.