महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केएलई अ संघाकडे हनुमान चषक

09:50 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : एसकेई सोसायटी आयोजित तिसऱ्या हनुमान चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केएलई इंटरनॅशनल अ संघाने ठळकवाडी संघाचा 27 धावांनी पराभव करून हनुमान चषक पटकाविला. मोहम्मद हमजाला सामनावीर व मालिकावीरने गौरविण्यात आले. भाग्यनगर येथील प्लॅटिनम जुबली मैदानावर खेळवण्यात आलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मराठा मंडळ संघाने प्रथम फलंदाजी करताना 14.5 षटकात सर्व गडी बाद 36 धावा केल्या. त्यात नमनने 15 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे ज्ञानेश्वर मोरेने 14 धावा 2 तर प्रज्योत उघडे, वेदांत पोटे, व मयूर जाधव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडी संघाने 5.2 षटकात 2 गडी बाद 37 धावा करून सामना 8 गाड्यांनी जिंकला.

Advertisement

त्यात प्रज्योत उगाडेने 3 चौकारांसह 15 धावा केला. मराठा मंडळातर्फे वरदराजने 18 धावांत 2 गडी बाद केले. दुपारी खेळविण्यात आलेला अंतिम सामन्यात केएलई इंटरनॅशनल अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 109 धावा केल्या. त्यात युग शहाने 2 चौकारांसह नाबाद 35 तर बरहाने 3 चौकारांसह 29 धावा केल्या. ठळकवाडी तर्फे ज्ञानेश्वर मोरेने 19 धावात 2 तर रोहित जाधवने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडी  संघाचा डाव 16.4 षटकात सर्व गडी बाद 82 धावात आटोपला. त्यात श्री उंदरेने 2 चौकारांसह 20, विराज बस्तवाडकरने 2 चौकारासह 18 तर प्रज्योत उगाडेने 14 धावा केल्या. केएलई तर्फे महमद  हमजाने 16 धावात 5, अतीत भोगणने 16 धावात 3, युग शहा, अब्रार यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला.
Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article