वैश्यवाडा हनुमान मंदिरात १२ एप्रिलला हनुमान जन्मोत्सव
विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
सावंतवाडी -
शहरातील वैश्यवाडा येथील श्री हनुमान मंदिरात १२ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त १२ व १३ एप्रिल रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त सकाळी आठ वाजता कीर्तनकार सौ ललिन तेली यांचे कीर्तन, दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वाजता भजनांचे कार्यक्रम, रात्री ८ वाजता देवगड भोळेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव महिला समईनृत्य नाद कार्यक्रम होणार आहे. रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार 13 एप्रिल रोजी रात्री ८ वाजता देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली यांचे आध्यात्मिक ट्रिकसिनयुक्त 'संत सखुसाठी देव सखु झाला ' हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी हनुमान जयंती उत्सवाचा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर उत्सव समिती वैश्यवाडा सावंतवाडी यांनी केले आहे.