For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुडाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव

05:41 PM Apr 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कुडाळ मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव
Advertisement

10 ते 12 एप्रिलपर्यंत दशावतारी नाटके व अन्य कार्यक्रम

Advertisement

कुडाळ - बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात 10 ते 12 एप्रिल या कालावधीत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त धार्मिक कार्यक्रमासह किर्तन , दशावतारी नाटके आदी कार्यक्रम होणार आहेत. या उत्सव कालावधीत रोज रात्री 8 30 वाजता पुराणवाचन, 9 वाजता श्रींची पालखी मिरवणूक, 10 वाजता कीर्तनकार भास्कर उर्फ राजू मुंडले बुवा यांचे कीर्तन होणार आहे. 10 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता जय हनुमान दशावतार मंडळ ( आरोस - सावंतवाडी यांचे वीर बब्रुवाहन नाटक,11 रोजी सायंकाळी 5 वाजता वावळेश्वर दशावतार मंडळ (तेंडोली - कुडाळ ) यांचे पंचमुखी हनुमान नाटक, 12 रोजी पहाटे 4.30 वाजता पुराण वाचन,5 वाजता श्री हनुमान जन्मावर किर्तन, सकाळी 6. 24 वाजता हनुमान जन्म, प्रसाद (सुंठवडा) वाटप , नंतर श्रींची पालखी मिरवणूक ( श्री देव मारुती मंदिर ते श्री देव कुडाळेश्वर मंदिर व तेथून पुन्हा मारुती मंदिर ) , सायंकाळी 5 वाजता विठ्ठलादेवी दशावतार मंडळ (राठिवडे - मालवण ) यांचे देव झाला मदारी नाटक, रात्री 12 वाजता कलेश्वर दशावतावर मंडळ (नेरुर - कुडाळ, कै.बाबी कलिंगण प्रस्तुत ) कर्मप्रकोप नाटक आदी कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमांना उपस्थित रहावे,असे आवाहन श्री देव नगर ब्राह्मण मारुती देवस्थान कमिटी ( कुडाळ) यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.