For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हंगिरगेकरचे 44 धावांत 5 बळी

06:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
हंगिरगेकरचे 44 धावांत 5 बळी
Advertisement

वृत्तसंस्था/इंदौर

Advertisement

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे गुरूवारपासून सुरू झालेल्या सामन्यात गोलंदाजांनी पहिला दिवस गाजविताना एकूण 12 गडी बाद केले. महाराष्ट्राने मध्यप्रदेशला पहिल्या डावात 187 धावांत गुंडाळल्यानंतर महाराष्ट्राने पहिल्या डावात 2 बाद 52 धावा जमविल्या. महाराष्ट्र संघातील राजवर्धन हंगिरगेकरने 44 धावांत 5 गडी बाद केले. मध्यप्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण महाराष्ट्राच्या अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांचा पहिला डाव 61 षटकांत 187 धावांत आटोपला. मध्यप्रदेशच्या एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

व्यंकटेश अय्यरने 2 षटकार आणि 4 चौकारांसह 39, यश दुबेने 5 चौकारांसह 29, शुभम शर्माने 2 चौकारांसह 28, रघुवंशीने 2 चौकारांसह 25 तर सोळंकी आणि जैन यांनी अनुक्रमे 11 आणि 10 धावा जमविल्या. कर्णधार पाटीदार केवळ 2 धावांवर बाद झाला. मध्यप्रदेशला 22 अवांतर धावा मिळाल्या. महाराष्ट्रातर्फे हंगिरगेकरने 5 तर अर्शिन कुलकर्णी आणि सक्सेना यांनी प्रत्येकी 2 यांनी दोन गडी बाद केले. त्यानंतर महाराष्ट्राने दिवसअखेर 13.2 षटकांत 2 बाद 52 धावा जमविल्या. मध्यप्रदेशच्या कुलदीप सेनने पृथ्वी शॉला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 14 धावा जमविल्या. कार्तिकेयने अर्जुन कुलकर्णीला बाद केले. त्याने 5 चौकारांसह 27 धावा केल्या. जोशी 4 धावांवर खेळत आहे. मध्यप्रदेशतर्फे सेन आणि कार्तिकेय यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

संक्षिप्त धावफलक : मध्यप्रदेश प. डाव सर्वबाद 187 (व्यंकटेश अय्यर 39, यश दुबे 29, शुभम शर्मा 28, रघुवंशी 25, अवांतर 22, हंगिरगेकर 5-44, अर्शिन कुलकर्णी व सक्सेना प्रत्येकी 2 बळी), महाराष्ट्र प. डाव 2 बाद 52 (शॉ 14, अर्शिन कुलकर्णी 27, जोशी खेळत आहे 4, सेन व कार्तिकेय प्रत्येकी 1 बळी).

गर्ग, चहल यांची अर्धशतके

मोहाली : रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे गुरूवारपासून सुरू झालेल्या ब इलाईट गटातील शेवटच्या प्राथमिक गटातील सामन्यात इमनजोत सिंग चहल आणि अभिजित गर्ग यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर पंजाबने कर्नाटकाविरूध्द पहिल्या डावात 9 बाद 303 धावा जमविल्या. या सामन्यात सुरूवातीला कर्नाटकाच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबची एकवेळ स्थिती 6 बाद 168 अशी केविलवाणी झाली होती. पण त्यानंतर अभिजित गर्ग आणि कर्णधार उदय सहारन यांनी समयोचित फलंदाजी करत बऱ्यापैकी कामगिरी केली. गर्गने 81 धावांचे योगदान दिले तर सहारनने 44 धावा जमविल्या. त्यानंतर 21 वर्षीय इमनजोत सिंग चहलने कर्नाटकाच्या फिरकी गोलंदाजीसमोर दमदार फलंदाजी केली. तो दिवसअखेर 77 धावांवर खेळत आहे. कर्नाटकातर्फे विद्याधर पाटीलने 46 धावांत 3 तर श्रेयस गोपालने 48 धावांत 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : पंजाब प. डाव 9 बाद 303 (अभिजित गर्ग 81, चहल खेळत आहे 77, सहारन 44, विद्याधर पाटील व श्रेयस गोपाल प्रत्येकी 3 बळी) वि. कर्नाटक. चंदीगड प. डाव सर्वबाद 136 (अर्जित सिंग 29, उनादकट 4-44), सौराष्ट्र प. डाव 1 बाद 167 (हार्विक देसाई खेळत आहे 80, गोहील खेळत आहे 61).

Advertisement
Tags :

.