For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मळगाव बॅाक्सेलवर लटकत असलेला फलक धोकादायक

12:32 PM Jul 05, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मळगाव बॅाक्सेलवर लटकत असलेला फलक धोकादायक
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
मळगाव येथील झाराप पत्रादेवी हायवेच्या बॅाक्सेलवर लावण्यात आलेला लोखंडी फलक अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहे.तो प्रवाशांच्या अंगावर पडून अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत निरवडे येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम गावडे यांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन हा धोकादायक फलक तात्काळ हटवावा,अशी मागणी केली आहे.त्याठिकाणी काही व्यावसायिक आपल्या जाहिरातींसाठी मोठमोठे फलक लावतात.मात्र त्यांच्या सुरक्षिततेसाठी काहीच केले जात नाही.परिणामी ते फलक लटकलेल्या अवस्थेत आहेत.सावंतवाडीतून शिरोड्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील बॅाक्सेलवर हा फलक लटकताना दिसत आहे.तो खाली पडल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही त्यामुळे यावर तात्काळ निर्णय घ्यावा,अशी मागणी गावडे यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.