For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | वेदांतला न्याय मिळालाच पाहिजे; सांगलीकरांचा कॅन्डल मार्च

11:42 AM Jun 16, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   वेदांतला न्याय मिळालाच पाहिजे  सांगलीकरांचा कॅन्डल मार्च
Advertisement

Advertisement

सांगली : एका निष्पाप मुलाच्या मृत्यूने संपूर्ण सांगली हळहळली आहे. वेदांत बंडगर या कोवळ्या जीवाचा गुंडगिरीच्या विळख्यात बळी गेल्यानंतर नागरिकांच्या भावना अनावर झाल्या. 'कायदा सुव्यवस्थेचा अंत...' बळी गेला वेदांत.. असे फलक हातात घेऊन शेकडो नागरिकांनी विश्रामबाग परिसरात कॅन्डल मार्च काढत वेदांतला अश्रुपूर्ण श्रद्धांजली वाहिली. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली यावेळी अनेकांनी वेदांतच्या पाहिजे अशी मागणी केली.

शहीद अशोक कामटे चौकापासून सुरू झालेला हा शांततापूर्ण मार्च विश्रामबागचौकातील क्रांतिसिंह नाना पाटील उद्यानासमोर पोहोचला. हातात मेणबत्त्या, डोळ्यांत अश्रू आणि मनात संताप घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी एकच घोषणा दिली वेदांतच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

Advertisement

या वेळी वेदांतचे वडील मारुती बंडगर, कुटुंबीय आणिनातेवाईक उपस्थित होते. आपल्या लेकराच्या आठवणींनी व्याकुळ झालेल्या कुटुंबाचे दुःख पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. वेदांतच्या अकाली जाण्याने केवळ एक कुटुंब नव्हे, तर संपूर्ण समाज हादरला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

श्रद्धांजली सभेत वक्त्यांनी गुंडगिरीवर कठोर कारवाईचीमागणी केली. एका निष्पाप बालकाचा जीव जाणे ही समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी भावना व्यक्त करण्यात आली. हमाल माथाडी महामंडळाचे छत्रपती संभाजीनगरचे सरचिटणीस सुभाष लोमटे म्हणाले, गुंडगिरीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली पाहिजे.

जत पोलीस ठाण्यात गोळीबाराची तक्रार दाखल करण्यासाठी चार तासापेक्षा अधिक विलंब केला त्यामुळेच या गुंडाचे ताकद वाढली आणि त्यातूनच वेदांत बंडगर याचा बळी गेला. याप्रकरणांची दखल मुख्यमंत्र्यांनीवेदांतला न्याय मिळालाच पाहिजे निष्पाप वेदांतच्या आठवणी आजही सांगलीकरांच्या मनात जिवंत आहेत, त्याच्या मृत्यूने निर्माण झालेली वेदना आणि संताप न्याय मिळेपर्यंत शांत होणार नाही, अशी भावना या कॅन्डल मार्चमधून व्यक्त झाली,घेतली पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बीडचे राजकुमार गायकवाड, प्रा. पद्माकर जगदाळे, मनसेचे तानाजी सावंत, ज्योती आदाटे, हमाल पंचायतचे विकास मगदूम, सतीश साखळकर, पृथ्वीराज पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.