राजकीय दबाव वापरून एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल, तर त्यांना फासावर लटकवलं पाहिजे
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांचे दिशा सानेल प्रकरणावर वक्तव्य
कोल्हापूर
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते. मंत्री शिरसाट यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट व माणगाव परिषदेच्या १०५ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. याप्रसंगी मंत्री शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी विचारणा झाल्यावर ते म्हणाले, सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू, मारहाण झाल्याचा चौकशी अहवाल आला आहे. याबाबतीत दोषींवर कठोर कारवाई करायलाच हवी तसं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.
दिशा सानेल प्रकरणावर बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले, दिशा सानेल हत्या प्रकरण गंभीर आहे. त्याला राजकारण म्हणून पाहू नका, ज्या दिवशी पार्टी झाली, तेव्हा तिच्यावर अत्याचार झाले, त्यातून तिचा झालेला मृत्यू संशायास्पद आहे. तिच्या वडिलांनी जे सांगितलं की, ते पाच वर्ष दबावाखाली होते, मुंबईच्या माजी महापौरांचं प्रेशर होतं. त्यामुळे ते नजर कैदेत असल्यासारखे होते. राजकीय दबाव वापरून एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल, तर त्यांना फासावर लटकवलं पाहिजे.
याप्रसंगी ते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, मुंबईच्या रस्त्यांवर हातात पाईप घेऊन रस्ते साफ करणारा मुख्यमंत्री जगाने पाहिला. २४ तास काम करणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख होती, त्यांच्यावर रस्त्याबाबतचे आरोप होत आहेत ते चुकीचे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरणं हे कोणाला शक्य नाही, साखळदंड तोडून बाहेर पडणारे आम्ही नेते आहोत.
नागपूरमध्ये झालेल्या दंगलीबद्दल बोलताना ते म्हणाले, देशात उपपंतप्रधान अडवाणी यांच्या काळापासून छत्रपती संभाजी नगर देशात अतिरेक्यांचा अड्डा मांडलं जायचं. काही हालचाली होत आहेत , दंगली घडवण्याचा त्यांचा मानस आहे, लोकांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी झालेली लाखोंची दंगल आहे, त्याचा परिणाम मुंबई सह अन्य ठिकाणी होऊ शकतो यासाठी शासन सतर्क आहे. दंगली घडवणाऱ्यांना ठेचण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. छत्रपती संभाजीनगमध्ये दर महिन्याला बांगलादेशी अतिरेकी कारवाया करणारे पकडले जातात. राज्यात मुंब्रा मालेगाव ही संवेदनशील ठिकाण आहेत. दंगलीत जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न नाही.
प्रशांत कोरटकर यांच्या अटकेविषयी बोलताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर नक्कीच पकडला जाईल कायद्यापेक्षा कोणी मोठ नाही. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱा तर नक्कीच अटक होईल. आरोपी स्वतःला शार्प समजून लपायचा प्रयत्न करतो मात्र हे जास्त दिवस राहणार नाही.
कोकणाची भाषा अरे-तुरेची पाहायला मिळते, सगळे मित्र आहेत.अधिवेशनात इतकी भाषा चालते. असेही मंत्री शिरसाट म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, २०१९ ची निवडणूक आम्ही युती म्हणून लढवली होती, निवडणूक एकत्र लढायची आणि सत्तेसाठी दुसऱ्या पक्षाकडे जायचं याबद्दलचा राग प्रत्येकाच्या मनात होता. आणि हे घडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आणि चमत्कार घडवला. बच्चू कडू आंदोलन करत आहेत, त्याची दखल सरकार घेईल.