हातोड्यापेक्षाही मजबूत हात
20 वर्षांपर्यंत अत्यंत तीव्र प्रशिक्षण
जेव्हा एखादा माणूस प्राचीन आणि अवघड कला शिकण्यासाठी स्वत:चे पूर्ण जीवन समर्पित करतो, तेव्हा त्याचे शरीर सामान्य माणसांच्या मर्यादा पार करत एका अविश्वसनीय चमत्काराता बदलून जाते. मार्शल आर्ट्सच्या जगतात असे अनेक सराव आहेत, जे मानवी सहनशक्तीची परीक्षा घेण्यासह त्याच्या शारीरिक रचनेलाही नेहमीसाठी बदलून टाकतात.चीनमध्ये 53 वर्षीय मार्शल आर्ट्स मास्टर झांग लॉन्गक्सियांग यांनी प्राचीन कुंग-फू कला ‘आयर्न सँड पाम’चा मागील 20 वर्षांपासून सातत्याने असा कठोर सराव केला आहे, की त्यांचा हात सामान्य लोकांच्या तुलनेत दुप्पट मोठा झाला आहे.
झांग यांना बालपणापासूनच कुंग-फू शिकण्याची आवड होती, परंतु 1998 मध्ये या कलेच्या एका मोठ्या मास्टरला भेटल्यावर त्यांनी या धोकादायक तंत्रज्ञानाला स्वत:च्या जीवनाचे लक्ष्य केले. आयर्न सँड पाम प्रत्यक्षात शाओलिनची एक अत्यंत प्रसिद्ध कंडिशनिंग पद्धती आहे, जी हार्ड किगोंगसोबत लोखंडी वाळू आणि अन्य कठोर गोष्टींवर हाताने प्रहार करण्याच्या तंत्रज्ञानाला जातो. या सरावामुळे हाडांचे घनत्व, टेंडनची शक्ती आणि वेदना सहन करण्याची क्षमता अविश्वसनीय रुपात वाढते. ज्याच्या साइइ-इफेक्टच्या रुपात तळहात अत्यंत मोठा होतो. झांगने ही कला शिकण्यासाठी स्वत:च्या जीवनातील 15 वर्षे कठोर शिस्तीत घालविली असून यातील 8 वर्षे त्यांनी स्वत:चे गुरु यांग शिनचुआन यांचे शिष्य म्हणून काम केले आहे.
स्वत:च्या वेदनादायी सरावाची आठवण करत झांग हे ही साधना अत्यंत असहनीय वेदनेने युक्त होते असे सांगतात. प्रतिदिन कमीतकमी दोन ते तीन तासांपर्यंत त्यांना लोखंडाच्या छोट्या छोट्या चेंडू आणि स्टील्सच्या बॉल्सनी भरलेल्या वाळूच्या पोत्यावर सुमारे 6 हजार वेळा स्वत:च्या हातांनी प्रहार करावा लागत होता. याचा प्रभाव म्हणून त्यांचे तळहात हातोड्यापेक्षाही मजबूत झाले. या कठिण साधनेदरम्यान झांग यांचे हात, बोटांचे जोड आणि हातांच्या मागील हिस्स्यावर अत्यंत मोठी अन् टणक चामडी विकसित झाली आहे. ज्यामुळे त्यांच्या हातांची जाडी जवळपास 8 सेंटीमीटर झाली आहे.
या साधनेदरम्यान त्यांच्या गुरुकडून देण्यात आलेल्या एका पांरपरिक औषधी वाइनने मोठी भूमिका पार पाडली आहे. हे औषध एकीकडे त्यांच्या हातांना गंभीर स्वरुपात हानिग्रस्त होण्यापासून वाचवत होते आणि दुसरीकडे हाडांना रुंद करण्यास मदत करत होते. झांगचे हे 3 इंच जाडीचे हात मार्शल आर्ट्स प्रदर्शनांमध्ये विटांच्या मोठ्या ढिगाला एका झटक्यात तोडून टाकतात आणि लाकडामध्ये हातांने खिळे ठोकू शकतात. स्वत:च्या याच शक्तीच्या बळावर झांगने 2006 पासून 2010 पर्यंत सलग 5 वेळा राष्ट्रीय मार्शल आर्ट्स स्पर्धांमध्ये विजय मिळविला आहे.