Hand Mouth Syndrome: हॅंड, माऊथ सिंड्रोम, काय आहेत लक्षण आणि कारण?
या सिंड्रोमपासून रूग्ण 10 दिवसांत बरा होतो
कोल्हापूर : चिमुकल्यांना हँड, माऊथ सिंड्रोम या संसर्गजन्य साथीचा धोका असतो. हात, पाय आणि तोंडाचा हा संसर्गजन्य आजार आहे. लहान मुलांच्या हात आणि पायांवर कांजण्या, वारफोडासारखे पुरळ येतात. या सिंड्रोमपासून रूग्ण 10 दिवसांत बरा होतो.
हवामान बदलाच्या काळात ६ 'एचएफएमडी'चा संसर्ग होतो. हँड, माऊथ सिंड्रोम संसर्गात मुलांच्या हात, पायांवर कांजण्या, वारफोडासारखे पुरळ येतात. तोंडात वेदनादायक फोडती येतात. त्याला वैद्यकीय भाषेत 'एचएफएमडी' म्हणतात. हा आजार ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना होतो.
तोष्सौम्य असून सामान्यपणे दहा दिवसांत बरा होतो. ही साथ एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये खोकला, शिंकण्यातून, तसेच दूषित वस्तूंच्या संपर्कातून पसरू शकते. त्यामुळे बालकामध्ये या आजाराची लक्षणे असतील तर त्याला इतर मुलांच्या संपर्कात जाऊ येऊ नये. आजार घातक नसला तरी संसर्गजन्य आहे.
यावर उपचारासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलाना ताप आल्यास त्यावर त्वरीत औषधोपचार करावेत. आपोआप बरा होत असला तरी काळजी घेणे आवश्यक आहे. या आजारात तापाची लक्षणे असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. साधारणतः त्याची लक्षणे ३ ते ७ दिवसांनी दिसू लागतात.
यात अनेकांना भूक न लागणे, सौम्य ताप येतो, घसा खवखवणे, वाहणारे नाक, तोंडात वेदनादायक फोड, पोटदुखी, हाताच्या, पायाच्या तळव्यावर, कोपरावर, गुडघ्यावर, खाज, पुरळ आदी लक्षण मुलांमध्ये दिसून येतात.
अशी लक्षणे आढळल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार घ्या. इतर मुलांच्या संपर्कात येणे टाळा, ज्यामुळे आजार पसरू नये. नियमितपणे हात स्वच्छ धुवा आणि मुलाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. मुलांना पुरेशी विश्रांती घेऊ द्या. भरपूर द्रव पदार्थ प्यायला द्या. जेणेकरुन शरीरातील पाण्याची पातळी कमी होणार नाही.
आजाराचे प्रमुख कारण :
एचएफएमडी म्हणजेच 'हँड, फूट अँड माऊथ'. याचे मुख्य कारण एन्टरोव्हायरस नावाचे विषाणू आहेत. विशेषतः कॉक्ससँकी व्हायरस १६ आणि एन्टरोव्हायरस ७१ हे विषाणू या आजारास कारणीभूत ठरतात.
"हा आजार साधारण हवामान बदलाच्या वेळेस उद्भवतो. आजार गंभीर नसला तरी काळजी घ्यावी. मुलाची भूक कमी होते काय, ताप कमी येतो की नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. मुलांची स्वच्छता ठेवली पाहिजे. कोल्हापूरमध्ये असे रुग्ण किरकोळ प्रमाणात आढळत आहेत."
- डॉ. शिशिर मिरगुडे, बालरोगतज्ज