For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॅमर बॉम्ब, स्कॅल्प क्षेपणास्त्र अन् राफेल

06:32 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
हॅमर बॉम्ब  स्कॅल्प क्षेपणास्त्र अन् राफेल
Advertisement

पाकिस्तानवर तुटून पडली अत्याधुनिक शस्त्रास्त्र

Advertisement

भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना अड्डयांना लक्ष्य करत ऑपरेशन सिंदूर फत्ते केले आहे. या ऑपरेशनमध्ये तिन्ही दलांची भागीदारी राहिली. 2019 मध्ये बालाकोट ऑपरेशननंतर भारताकडुन करण्यात आलेला हा सर्वात मोठा सीमापार अचूक हल्ला आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये शस्त्रास्त्रांचा वापर

Advertisement

भारताने या ऑपरेशनमध्ये अत्याधुनिक आणि दीर्घ पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांचा वापर केला. यात स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र, हॅमर प्रिसिजन बॉम्ब आणि लोइटरिंग म्युनिशन सामील होते.

स्कॅल्प क्रूज क्षेपणास्त्र

या क्षेपणास्त्राला ब्रिटनमध्ये स्टॉर्म शॅडो या नावाने ओळखले जाते. फ्रेंच-ब्रिटिश दीर्घ पल्ल्याचे, कमी दृश्यता असलेल्या आकाशातून जमिनीवर मारा करणारे हे क्रूज क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती युरोपीय संरक्षण कंपनी एमबीडीएकडून करण्यात आली असून हे भारताच्या 36 राफेल जेट्सचा हिस्सा आहे. स्कॅल्प क्षेपणास्त्र कुठल्याही वेळी आणि सर्व ऋतूंमध्ये डागता येऊ शकते. या क्षेपणास्त्रातील यंत्रणा जीपीएसचा वापर करते. हे क्षेपणास्त्र डागण्यात आल्यावर जमिनीच्या जवळून जात रडारला चकवा देते. स्वत:च्या लक्ष्यानजीक पोहोचताच यातील खास कॅमेरा (इन्फ्रारेड सीकर)पूर्वीच रिकॉर्ड करण्यात आलेल्या छायाचित्रांशी तुलना करते आणि अत्यंत अचूक ठिकाणी हल्ला करते. यामुळे केवळ निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्यालाच नुकसान होते.

स्कॅल्पची वैशिष्ट्यो...?

मारक पल्ला : 250-260 किलोमीटर (लाँचच्या उंचीच्या आधारावर)

? वेग : सबसोनिक, मॅक 0.8

(सुमारे 1000 किमी/प्रतितास)

?वजन : सुमारे 1300 किलोग्रॅम

?मार्गदर्शन प्रणाली : जीपीएस आणि नेव्हिगेशन

? इन्फ्रारेड सीकर : लक्ष्याच्या थर्मल इमेजच्या आधारावर अंतिम टप्प्यात मार्गदर्शन

?टेरेंस रेफरेन्स नेव्हिगेशन : भूभागाच्या वैशिष्ट्यांच्या आधारावर उ•ाण, जे रडारपासून वाचविण्यास करते मदत

?उ•ाण उंची : 100 ते 130 फूटांच्या कमी उंचीवर उ•ाण, जे याला रडारपासून वाचविण्यास करते सक्षम

लोइटरिंग म्युनिशन सिस्टीम

? लोइटरिंग म्युनिशनला आत्मघाती किंवा कामीकोजे ड्रोन्स देखील म्हटले जाते. हे एक अनमॅन्ड एरियल अस्त्र आहे आणि ते स्वत:च्या टार्गेटच्या वर  आकाशात घोंगावत राहते आणि कमांड मिळताच शत्रूच्या तळाला नष्ट करते. हा ड्रोन अत्यंत अचूक हल्ला करतो आणि लोइटरिंग म्युनिशनला एकाचवेळी वापरले जाऊ शकते, कारण हा स्वत:च्या लक्ष्यासोबतच फुटून जातो. हा एक पोर्टेबल ड्रोन सिस्टीम असून ती अत्यंत कमी वेळेत लाँच केली जाऊ शकते.

?एलएमएसची सर्वात मोठी शक्ती  अचूकता आणि नियंत्रण आहे. यात असलेले प्रगत सेन्सर आणि गायडेन्स सिस्टीम याला चिलखती वाहनांना नष्ट करण्याचीही क्षमता देतात. या सिस्टीमला एक सैनिकही ऑपरेट करू शकतो आणि रियल टाइममध्ये याला नियंत्रित केले जाऊ शकते. एलएमएसला जमीन, पाणी किंवा आकाश कुठूनही लाँच केले जाऊ शकते. ही सिस्टीम पारंपरिक क्षेपणास्त्रांच्या तुलनेत किफायतशीर आहे.

सर्वप्रकारच्या हल्ल्यांमध्ये सक्षम राफेल

राफेल फ्रेंच कंपनी डॅसाल्ट एव्हिएशनकडून निर्मित दोन इंजिन असलेले मध्यम मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट आहे. राफेल लढाऊ विमानांना ‘ओमनिरोल’ विमानांच्या स्वरुपात ठेवण्यात आले असून ते युद्धात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सक्षम आहे. ओमनिरोलचा अर्थ सर्वव्यापी भूमिका आहे. हा शब्द मुख्यत्वे विमानो•ाणात वापरला जातो. एक विमान विविध प्रकारचे मिशन, म्हणजेच आकाशातील युद्ध, हवाई समर्थन, बॉम्बवर्षाव इत्यादी भूमिका पार पडण्यास सक्षम आहे. याचमुळे राफेलला जागतिक स्तरावर सर्वाधिक सक्षम लढाऊ विमान मानले जाते.

हॅमर बॉम्ब

(हाइली एजाइल मॉड्यूलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज)

?हॅमर स्मार्ट बॉम्बचा वापर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या बंकर्स आणि बहुमजली इमारतींसारख्या मजबूत संरचना नष्ट करण्यासाठी करण्यात आला आहे. हॅमर एक अचूक-निर्देशित, स्टँडऑफ म्युनिशन असून ते लाँचच्या उंचीच्या आधारावर 50-70 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे.

?हॅमर बॉम्बची निर्मिती सॅफरॉन इलेक्ट्रॉनिक्स अँड डिफेन्स नावाच्या एका फ्रेंच कंपनीकडून केली जाते. ही कंपनी फ्रान्सची एक प्रमुख संरक्षण आणि एअरोस्पेस तंत्रज्ञान निर्माता आहे. हॅमर बॉम्बची निर्मिती कंपनीकडुन गुप्त ठिकाणी केली जाते आणि संरक्षण शस्त्रास्त्रांच्या उत्पादन स्थळांची माहिती गोपनीय ठेवली जाते.

हॅमरमध्ये काय असते?

हॅमर एक मॉड्यूलर किट असून त्यात 125 किलो ते 1 हजार किलोग्रॅम पयर्तंच्या मानक बॉम्बना जोडले जाऊ शकते. या किटमध्ये रॉकेट बूस्टर, विंग्स आणि गायडेन्स सिस्टीम (जीपीएस, इन्फ्रारेड किंवा लेझर) सामील असते, जे याला स्मार्ट बॉम्बमध्ये बदलतात.

राफेलने पाकिस्तानात घडविला विध्वंस...

? जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर नावाने एक अभियान राबवत पाकिस्तान अन् पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळच नष्ट केले आहेत. या ऑपरेशनमध्ये फ्रान्सकडुन खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमानांचा वापर करण्यात आला आहे. याच लढाऊ विमानांमधून स्कॅल्प क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. राफेलने पाकिस्तानच्या सीमेत न शिरताच तेथे विध्वंस घडवून आणला आहे. स्टॉर्म शॅडो किंवा स्कॅल्प हे क्षेपणास्त्र केवळ लढाऊ विमानातूनच डागण्यात येते. या क्षेपणास्त्रासाठी राफेल लढाऊ विमान सर्वात योग्य आहे.

?भारतीय वायुदलाने फ्रान्सकडून प्राप्त सर्व राफेल विमानांना स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी युक्त केले आहे. राफेलचा ध्वनिच्या वेगापेक्षा वेग आणि स्कॅल्प क्षेपणास्त्राची मारकक्षमता यामुळे दोघांची जोडी अत्यंत धोकादायक ठरते. या जोडीने ऑपरेशन सिंदूरला यशस्वी करण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Advertisement
Tags :

.