हमासचा क्रूरकर्मा इस्रायलच्या कारवाईत ठार
3 महिलांच्या अपहरणात सामील
वृत्तसंस्था, तेल अवीव
इस्रायलचे सैन्य आणि शिन बेटने गाझापट्टीत एक हवाई हल्ला केला. मध्य गाझ्घच्या नुसेरात भागात झालेल्या या हल्ल्यात सहेर निदाल सकर मारला गेला आहे. सकर हा दहशतवादी संघटनेत सामील होता आणि 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात सामील होता.
सकरने नोआ अर्गमनी आणि अविनतन ओर यांचे अपहरण केले होते. दोघींना नोवा म्युझिक फेस्टिव्हलमधून उचलून नेण्यात आले होते. त्यादिवशीच्या कुख्यात फुटेजमध्ये सकर हा अर्गमनी हिला दुचाकीवर बसवून गाझापट्टीत नेताना दिसून आला होता. सकर याच्या खात्म्यासाठीचा हल्ला इस्रायल पोलिसांच्या विशेष गिदओनिम युनिट 33 ने घडवून आणला आहे.
सकर युद्धादरम्यान हमासला शस्त्रास्त्रs पोहोचवित होता. अलिकडच्या दिवसांमध्ये तो सैनिक आणि इस्रायली नागरिकांवर हल्ल्यांची तयारी करत होता. हमास आणि इस्लामिक जिहादच्या सेना विंगमध्ये तो दहशतवाद्यांसोबत मिळून काम करत होता आणि युद्धविराम कराराचे उल्लंघन करत होता. हल्ल्याचा धोका नष्ट करण्यासाठी त्याला लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आले.
7 ऑक्टोबर 2023 रोजीच्या हमासच्या नेतृत्वात अनेक दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. नोव्हा फेस्टिव्हल त्या दिवशीच्या हल्ल्यांमुळे सर्वाधिक प्रभावित ठिकाण ठरले होते. तेथून अनेक जणांना अपहरण करण्यात आले किंवा अनेकांना तेथे जीव गमवावा लागला होता. अर्गमनी आणि ओर यांचे अपहरण त्या दिवशीच्या अनेक घटनांमध्ये सामील होते.
इस्रायलची कारवाई
नुसेरात हे मध्य गाझामधील भाग आहे. इस्रायलने ही कारवाई हल्ल्याचा धोका दूर करण्याच्या उद्देशाने केली होती. तर गिदओनिम युनिट 33 ला विशेष अभियानांसाठी ओळखले जाते. इस्रायलच्या सैन्याने सकर हा दहशतवादी संघटनांशी संबंधित होता असे सांगितले आहे. सकर प्रकरणी अपहरणाच्या फुटेजला पुराव्यादाखल सादर करण्यात आले आहे. नोआ अर्गमीनची मुक्तता नंतर झाली होती.