For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात 10 डिसेबरपर्यंत हमारा शौचालय, हमारा भविष्य मोहीम

01:29 PM Nov 23, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur   कोल्हापूर जिल्ह्यात 10 डिसेबरपर्यंत हमारा शौचालय  हमारा भविष्य मोहीम
Advertisement

                       स्वच्छता, आरोग्य व सुरक्षित मलनिस्सारणाबाबत जनजागृती

Advertisement

कोल्हापूर : जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र शासनाच्या जलशक्ती विभागा मार्फत हमारा शौचालय, हमारा भविष्य ही विशेष मोहिम सुरू करण्यात येत आहे. ही मोहीम १९ नोव्हेंबरपासून मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे १० डिसेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकयन एस. यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायती मध्ये या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुचना तालुका अधिकारी कर्मचारी यांना दिली आहे.

शौचालये ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालये यांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

या कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण तसेच हवामान अनुकूल स्वच्छतेबाबत जनजागृती केली जाणार आहे. ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत गावागावांत मोहिमेचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १० डिसेंबर रोजी मोहिमेचा समारोप करून उत्कृष्ट शौचालय पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. या मोहिमेत ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Advertisement
Tags :

.