For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

कांद्यांच्या 20 पोत्यांची चोरी करणारा हमाल जेरबंद; साथिदारांचा शोध सुरु

12:18 PM Feb 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
कांद्यांच्या 20 पोत्यांची चोरी करणारा हमाल जेरबंद  साथिदारांचा शोध सुरु
Kolhapur Crime

कोल्हापूर प्रतिनिधी

कांद्यांच्या 20 पोत्यांची परस्पर विक्री करुन चोरी करणाऱ्या हमालास शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले. संजय गणपती लोहार (वय 45, रा. बांदिवडे, ता. पन्हाळा) असे कांदा चोर हमालाचे नाव आहे. त्याच्याकडून 20 हजार रुपये किमतीची कांद्याची 20 पोती हस्तगत केली. गुरुवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या दोन साथिदारांचा शोध सुरु आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, राजर्षी शाहू मार्केट यार्डमध्ये कांदा व्यापारी बन्शीलाल अँड सन्स, अनुप रुपमल पोपटाणी आणि दगडू धोंडीराम जानकर यांच्या दुकानात उतरवली जाणारी 20 कांद्याची पोती चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत 28 जानेवारीला शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली. फिर्यादींकडून माहिती घेतल्यानंतर काही हमालांनीच कांद्याची पोती लांबवली असावित, असा पोलिसांना संशय आला. त्यानुसार संशयित संजय लोहार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. ट्रकमधून पोती उतरवतानाच त्याने मार्केट यार्डातील दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात 20 पोती पोहोचवली. या गुह्यात त्याच्या आणखी दोन साथीदारांचा समावेश असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. लोहार गेल्या दहा वर्षांपासून मार्केट यार्डमध्ये हमालीचे काम करीत आहे. न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.