For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हालुमत संघटनेचा काँग्रेसला पाठिंबा

10:04 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
हालुमत संघटनेचा काँग्रेसला पाठिंबा
Advertisement

समाज बांधवांच्या मेळाव्यात निर्णय

Advertisement

बेळगाव : बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदारांनी पाठिंबा द्यावा. सरकारने दिलेले वचन पाळले आहे. सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देऊन अधिक बळकट करावे, असे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. यरगट्टी येथे हालुमत समाज बांधवांच्या मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी हालुमत समाज बांधवांतर्फे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बेळगाव लोकसभा मतदारसंघातील मृणाल हेब्बाळकर व चिकोडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा देण्याचा निर्धार करण्यात आला. मेळाव्यामध्ये मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष के. एम. रामचंद्रप्पा, शोषित समाज संघटनेचे अध्यक्ष मावळ्ळी शंकर, कर्नाटक प्रदेश कुरबर संघाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र सन्नक्की, कर्नाटक प्रदेश कुरबर संघटनेचे कार्याध्यक्ष बसवराज बसळीगुंदी, उपाध्यक्ष विनायक बनहट्टी, निदर्शेक डी. डी. टोपोजी, अशोक मेटगुड, डॉ. एस. एन. पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.