For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वयाच्या 59 व्या वर्षी चौथा विवाह करणार हॅले बेरी

06:22 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
वयाच्या 59 व्या वर्षी चौथा विवाह करणार हॅले बेरी
Advertisement

गायक वॅन हंटसोबत थाटणार संसार

Advertisement

हॉलिवूड अभिनेत्री हॅली बेरी दीर्घकाळापासून गायक, गीतकार वॅन हंटला डेट करत आहे. हॅलीने आता स्वत:च्या एंगेजमेंटची वाच्यता केली असून वॅनसाब्sात कधी विवाह करणार याचा खुलासाही केला आहे.

वॅनने मला विवाहासाठी विचारल्यावर मी होकार दिला. परंतु सध्या आमच्याकडे विवाहाच्या तारखेवरून कुठलीच अपडेट नाही. पण मी त्याच्यासोबत विवाह अवश्य करणार असल्याचे हॅलीने सांगितले आहे. हॅलीच्या या घोषणेनंतर तिचे चाहते आनंदी झाले आहेत.

Advertisement

हॅली बेरीने वॅन हंटसोबत विवाह केल्यास तिचा हा चौथा विवाह असणार आहे. यापूर्वी ती बेसबॉलपटू डेव्हिड जस्टिस, गायक-गीतकार एरिक बेनेट आणि फ्रेंच अभिनेता ओलिवियर मार्टिनेजसोबत विवाहबंधनात होती. डेव्हिड जस्टिससोबत हॅलीने 1993 मध्ये विवाह केला होता तर 1997 मध्ये घटस्फोट घेतला होता. यानंतर 2001 साली तिने एरिक बेनेटसोबत दुसरा विवाह केला आणि 2005 मध्ये त्याच्यासोबत काडीमोड घेतला होता. तिसरा विवाह हॅलीने ओलिवियर मार्टिनेजसोबत 2013 साली केला होता. पण 2016 मध्ये दोघेही विभक्त झाले होते. आता हॅली आणि वॅन हंट स्वत:च्या नव्या नात्यावरून चर्चेत आहेत.

हॅली ही ‘मॉन्टर्स बॉल’ या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कारची मानकरी ठरली होती. तर ती एक्स मॅन प्रेंचाइजीमध्ये स्टॉर्म नावाची भूमिका साकारते. ही भूमिका प्रेक्षकांना अत्यंत पसंत आहे. या चित्रपटांसोबत ती ‘द कॉल’ आणि ‘बाँड डाय अनदर डे’मध्ये दिसून आली होती.

Advertisement
Tags :

.