Kolhapur : हलकर्णी-आजरा रस्ता काम निकृष्ट दर्जाचे !
हलकर्णी–महागाव–चंदगड रस्त्यावर वळणे दुरुस्तीची आवश्यकता
मलिग्ने : हलकर्णी-महागाथ-आजरा-चंदगड या रस्त्याच्या कामाला मार्च पासून सुरवात झाली आहे. आजरा तालुक्यातील भावेवाडी, चितळे, जेऊर, उचंगी, श्रृंगारवाडी हा रस्त्यावरील गावांना पावसाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. दिवाळीच्या नंतर आजरा-महागाव रस्ताचे कामकाज जोरदारपणे सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही साईड पट्ट्या खुदाई करून, भरावा घालण्याचे काम दिवरात्र सुरू आहे. या रस्त्यावर धुळीचे लोन पसरले असून वेडी वाकडी वळणे व जंगल परीसरमधून जाताना वाहन धारकांनी सावधगिरी बाळगून दक्षता घेण्याची गरज आहे.
मलिग्रे तिव्यापासून रस्त्याच्याकामाला सुरवात केली असून दोन्ही साईड पट्ट्या खुदाई करून डबर रोलींगच्या कामाबरोबर रस्ता कॉक्रेटीकरण सुरुवात केली आहे. पण ही कामाची पद्धत पाहता जनेतून नाराजीचा सुर दिसून येत आहे. महागाव आजरा रस्त्यावर डोंगर भाग असून चढ उतारामुळे वेडी वाकडी वळणाची संख्या बरीच
आहे. रस्ता रुंदीकरणासह सरळ रेषेत न घेता, जुन्या रस्त्याच्या मार्गाने कामकाज सुरू असून, कामाच्या दर्जा बाबत प्रश्न निर्माण झाले असल्याने लोकांच्या मधून तीव्र नाराजी दिसत आहे. रस्ता कॉक्रेटीकरणावर पाणी मारले जात नसल्याने रस्ता मजबुती करणाचा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला
आहे.
संकेश्वर बांदा रस्त्याप्रमाणे हलकर्णी महागाव चंदगड रस्ता होणार असे सांगण्यात आले असताना, मलिग्ने पासून सुरू केलेल्या कामावरून जनतेचा भ्रमनिरास होत आहे. मलिग्रे येथील काळीमाणीचे वळण तसेच काळकाईच्या ओढ्या जवळचे वळण, वन विभागातील चाफ्याची भावीचे वळण व होणेवाडी गावाकडे जाणारा कच्चा रोड लागून असणारे वळण हात्तीवडे मेंढोली ओढ्याचे वळण ही वळणे दुरूस्ती करणे आवश्यक आहेत.
वनविभागातील रस्त्यावर संध्याकाळी सहा नंतर वन्य प्राणी जंगलातून पेद्रेवाडी हाजगोळी जंगलाकडे ये जा करताना वाहनधारकाच्या आडवे येतात. यासाठी उडाण पुलाची सोय करावी, अशी मागणी होत आहे.