For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

२२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी, केंद्र सरकारची माहिती

04:02 PM Jan 18, 2024 IST | Kalyani Amanagi
२२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी  केंद्र सरकारची माहिती
Advertisement

सध्या सर्वांचे लक्ष अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे लागले आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं येत्या २२ जानेवारी रोजी केंद्र सरकारनं अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार या दिवशी केंद्र सरकारची सर्व कार्यालयं अर्धा दिवस बंद राहणार आहेत. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisement

येत्या २२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. सात दिवस आधी, म्हणजे १६ जानेवारीला अयोध्या मंदिर परिसरात या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. प्राणप्रतिष्ठेच्या आधी दररोज विशिष्ट विधी केले जात आहेत. २२ जानेवारीच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, आसाम, छत्तीसगड या राज्यांत २२ जानेवारीला ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. आता केंद्र सरकारनं सरकारी कार्यालयं बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.