महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पृथ्वी शॉचे दीडशतक, मुंबई 4/310

06:45 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भुपेन लालवाणीचेही शतक, छत्तीसगडच्या गोलंदाजांची धुलाई

Advertisement

वृत्तसंस्था/ रायपूर

Advertisement

मुंबईकर सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ ने रणजी ट्रॉफी मध्ये छत्तीसगडविरुद्ध दुसरा सामना खेळत असताना दीडशतकी खेळी साकारली आहे. रणजी मोसमातील पृथ्वी शॉ चे हे पहिले शतक असून त्याने अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत अखेर क्रिकेटच्या मैदानात तो लयीत परतला आहे. पृथ्वीचे दीडशतक (159) व भुपेन लालवणीचे शतक (102) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या दिवसअखेर 86 षटकांत 4 बाद 310 धावा केल्या.

24 वर्षीय पृथ्वी शॉने शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या मुंबई विरुद्ध छत्तीसगड सामन्यात 102 चेंडूत शतक पूर्ण केले. यामध्ये त्याने 13 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. तर पृथ्वीचे हे 80 डावातील 13 वे प्रथम श्रेणी शतक आहे. पृथ्वी काही काळ दुखापतीशी झुंजत होता आणि त्यामुळे सय्यद मुश्ताक अली, विजय हजारे ट्रॉफी आणि या रणजी मोसमाच्या पूर्वार्धात मुंबईचे प्रतिनिधित्व करणे त्याला शक्य झाले नव्हते. पण स्पर्धेच्या उत्तरार्धात या शतकासह त्याने शानदार पुनरागमन केले. छत्तीसगडविरुद्ध लढतीत मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर सलामीवीर पृथ्वी शॉ व भुपेन लालवाणी यांनी 244 धावांची सलामी दिली. या जोडीने छत्तीसगडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. पृथ्वीने 185 चेंडूत 18 चौकार व 3 षटकारासह 159 धावा केल्या. लालवणीने देखील त्याला साथ देताना 10 चौकारासह 102 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेही या सामन्यातही अपयशी ठरला. 1 धावा काढून तो बाद झाला. अमोल भटकलने 16 धावा केल्या. यानंतर सुर्यांश शेडगे (नाबाद 17) व हार्दिक तोमोर (नाबाद 1) यांनी दिवसअखेर आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुंबईने 86 षटकांत 4 बाद 310 धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक : मुंबई पहिला डाव 86 षटकांत 4 बाद 310 (पृथ्वी शॉ 159, भुपेन लालवाणी 102, भटकल 16, अजिंक्य रहाणे 1, शेडगे खेळत आहे 17, तोमोर खेळत आहे 1, आशिष चौहान 3 बळी).

विदर्भाने महाराष्ट्राला 208 धावांवर गुंडाळले

पुणे : येथील एमसीएच्या स्टेडियमवर सुरु असलेल्या रणजी चषक स्पर्धेत विदर्भाने महाराष्ट्राला पहिल्या डावात 208 धावांवर गुंडाळले. आदित्य सरवटे, यश ठाकूर व ललित यादव यांच्या भेदक माऱ्यासमोर एकाही महाराष्ट्राच्या फलंदाजांला मोठी खेळी साकारता आली नाही. सलामीवीर पवन शाहने 35 तर तळाचा फलंदाज मनोज इंगळने सर्वाधिक 36 धावा केल्या. यानंतर विदर्भाने आक्रमक सुरुवात करताना पहिल्या दिवसअखेर 24 षटकांत 1 बाद 111 धावा केल्या होत्या. दिवसअखेरीस ध्रुव शोरे 55 तर यश राठोड 29 धावांवर ख्sाळत होते. विदर्भाचा संघ अद्याप 97 धावांनी पिछाडीवर आहे.

देवदत्त पडिक्कलचे नाबाद दीडशतक, कर्नाटक 5 बाद 288

चेन्नई : रणजी चषक स्पर्धेतील अन्य एका सामन्यात कर्नाटकने तामिळनाडूविरुद्ध पहिल्या डावात 90 षटकांत 5 बाद 288 धावा केल्या. पडिक्कलने शानदार खेळी साकारताना 216 चेंडूत नाबाद 151 धावा फटकावल्या. रवि समर्थनेही 57 धावांची खेळी साकारली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा हार्दिक राज 35 तर पडिक्कल 151 धावांवर खेळत होते. तामिळनाडूकडून साइ किशोरने सर्वाधिक 3 बळी मिळवले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article