मोसमोत्तर अर्धा इंच पावसाची नोंद
03:45 PM Oct 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : राज्यात मोसमोत्तर पावसाळ्याच्या पहिल्याच दिवशी सरासरी अर्धा इंच पावसाची नोंद झाली. पुढील दोन-तीन दिवसांमध्ये तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये म्हापसा येथे सव्वा इंच, पेडणेमध्ये दीड इंच, पणजीत 1 से.मी., जुने गोवे येथे 1 से.मी., सांखळीमध्ये पाऊण सेंमी, फोंडा अर्धा इंच, धारबांदोडा पाऊण इंच, काणकोण जवळपास 1 इंच, दाबोळी, मडगाव येथे प्रत्येकी 1 सेमी, तर मुरगावात अर्धा इंच आणि सांगेमध्ये पाऊण इंच पावसाची नोंद झाली. केपे येथे अर्धा से.मी. पाऊस पडला. आज काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 7 ऑक्टोबरपर्यंत सर्वत्र मध्यमस्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
Advertisement
Advertisement