एचएएलचा समभाग 7 टक्के घसरणीत
06:47 AM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
दुबई एअर शोमध्ये तेजसचे फाइटर विमान कोसळल्याच्या दुर्घटनेचा परिणाम हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिडेट अर्थात एचएएलच्या समभागावर सोमवारी नकारात्मक दिसून आला. दोन दिवसांच्या सत्रात समभाग जवळपास 7 टक्के इतका घसरणीत राहिला होता. सोमवारच्या सत्रात समभाग इंट्रा डे दरम्यान 3.11 टक्के घसरत म्हणजेच 143 रुपयांनी कमी होत 4452 रुपयांवर घसरला होता. याआधी शुक्रवारी समभाग 4595 रुपयांवर तर गुरुवारी 4716 रुपयांवर बंद झाला होता.
Advertisement
Advertisement