For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनरल इलेक्ट्रिकवर एचएएलकडून दंड

06:44 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
जनरल इलेक्ट्रिकवर एचएएलकडून दंड
Advertisement

तेजससाठी एफ404 इंजिन देण्यास मोठा विलंब : अमेरिकेच्या कंपनीविरोधात उचलले पाऊल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताच्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) स्वदेशी लढाऊ विमान तेजससाठी एफ404 इंजिन पुरवठ्यात विलंबासाठी अमेरिकेची कंपनी जीई एअरोस्पेसला दंड ठोठावला आहे. एलसीए एमके1ए तेजससाठी इंजिन्सचा वेळेत पुरवठा करण्यास चुकल्यामुळे अमेरिकेच्या कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे. परंतु किती दंड ठोठावण्यात आला याविषयी खुलासा करण्यात आलेला नाही.

Advertisement

एचएएलने 99 इंजिन्सची ऑर्डर दिली होती, ज्याचा पुरवठा 2024 पासून होणार होता. परंतु पुरवठासाखळीत विलंब झाल्याने जीई या इंजिन्सचा वेळेत पुरवठा होऊ शकला नव्हता. अमेरिकेची कंपनी आतापर्यंत केवळ 6 इंजिन्सचाच पुरवठा करू शकली. 700 दशलक्ष डॉलर्सच्या किमतीची ही ऑर्डर अमेरिकेच्या कंपनीला देण्यात आली होती.

2025 मध्ये आणखी 113 इंजिन्ससाठी करार

मागील वर्षी एलसीए एमके1ए दुसऱ्या तुकडीसाठी जनरल इलेक्ट्रिकसोबत 113 एफ404 इंजिन्सच्या खरेदीसाठी 1 अब्ज डॉलर्सचा करारा करण्यात आला होता. अमेरिकेच्या कंपनीने चालू वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी 20 इंजिन्स उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु कंपनी हे आश्वासन पूर्ण करू शकणार की नाही याबद्दल साशंकता आहे.

तेजससाठीच्या इंजिनची क्षमता

-जीई एफ404 एक आफ्टरबर्निंग टर्बोफेन इंजिन आहे.

-एफ/ए-18 हॉर्नेटला जवळपास 19,000 1बीएफ थ्रस्ट देण्यासाठी ओळख

-इंजिनची रुंदी 35 इंच आणि लांबी 154 इंच असते.

-इंजिनमध्ये तीन फॅन आणि 7 हाय प्रेशर कंप्रेसर असतात.

-हलक्या लढाऊ विमानासाठी अत्यंत विश्वसनीय इंजिन आहे.

-यामुळे हाय थ्रस्ट मिळतो, वजनाला संतुलित करण्यास मदत मिळते.

Advertisement
Tags :

.