For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तेजस ब्रेकफेलचा दावा ‘एचएएल’ने फेटाळला

06:34 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
तेजस ब्रेकफेलचा दावा ‘एचएएल’ने फेटाळला
Advertisement

किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्याचे स्पष्टीकरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) सोमवारी भारतीय हवाई दलाच्या तेजस लढाऊ विमानाच्या अपघाताचे वृत्त फेटाळून लावले. तेजस विमानात जमिनीवर किरकोळ तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र, हवेत असताना ब्रेकफेल किंवा अन्य कोणतीही अनुचित घटना घडली नाही, असे ‘एचएएल’ने म्हटले आहे.  हवाई दलाच्या सहकार्याने तांत्रिक समस्येची चौकशी केली जात असून लवकरच ती दुरुस्ती केली जाईल असेही कंपनीकडून सांगण्यात आले. तसेच भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील ‘तेजस’ हे जगातील आधुनिक लढाऊ विमानांमध्ये सर्वोत्तम सुरक्षा रेकॉर्डपैकी एक असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

Advertisement

7 फेब्रुवारी रोजी लँडिंग दरम्यान तेजसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले. अपघातापूर्वी पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला, परंतु विमानाचे नुकसान झाले, अशी चर्चा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये रविवारी रात्रीपासून पसरली होती. यावर ‘एचएएल’ने योग्य खुलासा करत खरी परिस्थिती स्पष्ट केली आहे.   तेजस हे ‘एचएएल’ने विकसित केलेले एकल-इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे.

तेजस विमानाला अपघात घडल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून दिल्या जात होत्या. स्वदेशी बनावटीचे तेजस हलके लढाऊ विमान एका प्रमुख फ्रंटलाइन एअरबेसवर लँडिंग करताना कोसळले. सुदैवाने, पायलट सुरक्षित आहे, परंतु या घटनेने हवाई दलासाठी एक मोठा तांत्रिक आव्हान निर्माण केले आहे आणि संपूर्ण ताफ्याला चौकशीच्या अधीन केले असल्याचे दावे केले जात होते. खबरदारीचा उपाय म्हणून, हवाई दलाने सुमारे 30 सिंगल-सीटर तेजस विमानांचा संपूर्ण ताफा तात्पुरता ग्राउंड केला आहे. या सर्व विमानांना तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले आहे. इतर विमानांच्या ब्रेकिंग सिस्टीम किंवा स्ट्रक्चर्समध्ये अशाच तांत्रिक त्रुटी आहेत का हे निश्चित करण्यासाठी तज्ञांची एक उच्चस्तरीय टीम आता या सर्व विमानांची सखोल तपासणी करत आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची खात्री हवाई दल प्रशासनाकडून सुरू आहे.

Advertisement
Tags :

.