For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

11 सप्टेंबरला प्रदर्शित होणार ‘हैवान’

06:21 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
11 सप्टेंबरला प्रदर्शित होणार ‘हैवान’
Advertisement

सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांची जोडी पाहण्याची चाहते दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत आहेत. प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनातील क्राइम थ्रिलरपट ‘हैवान’ची घोषणा झाल्यावर दोघांचे चाहते उत्सुक झाले होते. आता निर्मात्यांनी  प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

Advertisement

हैवान चित्रपटाचे निर्माते केव्हीएन प्रॉडक्शनने सैफ-अक्षयचा चित्रपट 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. ‘एक ऑब्सेशन, एक भरपूर प्रयत्न, एक अशी तारीख, जी तुम्हाला सदैव आठवणीत राहणार आहे. प्रियदर्शन यांचा हैवान 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अक्षयची ऑनस्क्रीन जर कुठल्याही अभिनेत्यासोबतची जोडी सर्वाधिक पसंत करण्यात आली असेल तर ती सुनील शेट्टी आणि सैफ अली खानसोबतची आहे. अक्षय आणि सैफने पहिल्यांदा 1994 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘मैं खिलाडी तू अनाडी’मध्ये एकत्र काम केले होते. यानंतर दोघांची जोडी ताशान, आरजू, तू चार मैं सिपाही आणि टशन या चित्रपटांमध्ये दिसून आली होती.

Advertisement
Advertisement

.