महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलगा परिसरात वळिवाने हवेत गारवा

10:50 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /हिंडलगा

Advertisement

हिंडलगा परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजता विजांच्या गडगडाटासह वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. सकाळपासून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. या उष्णतेमुळे पावसाचे निश्चित आगमन होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. आतापर्यंत हिंडलगा भागात एकदाही पावसाने हजेरी लावली नव्हती. त्यामुळे लोक चिंतेत होते. तसेच या भागातील विहिरींनीही तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी लोक त्रासले होते. आज अचानक दुपारी चार वाजता विजांच्या गडगडाटासह अर्धातास झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी केले. तसे पाहिले तर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी पावसाने नुकसान केले होते. पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारठा निर्माण झाला. त्यामुळे पहिल्याच पावसामुळे मातीचा सुगंध सर्वत्र दरवळला. शेतकरी वर्ग जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. तरी या पावसामुळे शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. या भागातील मिरची, कोबी, पिकांना अंशत: जीवदान मिळाले. या भागातील नदी, नाले कोरडे पडल्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दमदार पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्ग थोडा सुखावला आहे. परंतु एक जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. गेला महिनाभर हिंडलगा पंचक्रोशीत पाऊस न पडल्याने नागरिक चिंताग्रस्त होते. थोड्याशा पावसाने का असेना लोक आनंदीत झाले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article