For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘है जवानी तो इश्क होना है 12 मेला झळकणार

06:27 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘है जवानी तो इश्क होना है 12 मेला झळकणार
Advertisement

वरुण धवन-पूजा हेगडेचा चित्रपट

Advertisement

वरुण धवन, मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडेची मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलण्यात आली आहे. हा चित्रपट यापूर्वी 12 जून रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु आता हा चित्रपट 22 मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांसाठी सादर करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण धवनचे पिता आणि दिग्गज दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी केले आहे. ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘जुडवा 2’नंतर वरुण आणि डेव्हिड यांच्या जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे.

Advertisement

चित्रपटात वरुण, मृणाल आणि पूजासोबत मौनी रॉय तसेच चंकी पांडे यांच्यासह अनेक कलाकार दिसून येणार आहेत. चित्रपटाने यापूर्वीच सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविली आहे. याचमुळे निर्माते आता लोकांच्या या उत्सुकतेचा लाभ उचलू पाहत आहेत.

Advertisement
Tags :

.