महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हाफिज सईदचा पुत्र निवडणूक रिंगणात

06:08 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लाहोरमधून नॅशनल असेंब्लीच्या निवडणुकीसाठी केला अर्ज

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद पाकिस्तानमध्ये खासदार होऊ शकतो. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’च्या वृत्तानुसार, तलहा सईद लाहोरच्या एनए-127 जागेवरून निवडणूक लढवत असून त्यासाठी त्याने उमेदवारीही दाखल केली आहे. तो पाकिस्तान मरकझी मुस्लीम लीग (पीएमएमएल) च्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. या पक्षाला हाफिज सईदच्या अज्ञात स्त्राsतांकडून सर्व निधी मिळतो, असे मानले जाते.

पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारी 2024 रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत ‘पीएमएमएल’ पूर्ण क्षमतेने लढण्याच्या तयारीत आहेत. या पक्षाचे अध्यक्ष खालिद मसूद सिंधू आहेत. ते एन-130 या जागेवरून निवडणूक लढवत आहेत आणि येथे त्यांची स्पर्धा माजी पंतप्रधान आणि पीएमएल-एनचे सुप्रीमो नवाझ शरीफ यांच्याशी आहे. त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह खुर्ची आहे. हाफिज मोहम्मद सईदचा मुलगा तलहा हाही 8 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार आहे. तलहा आपल्या सभांमध्ये भारत, इस्रायल, अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांविऊद्ध जिहादची धमकी देत असल्याचे सांगण्यात येते.

आम्ही नॅशनल असेंब्लीच्या सर्व जागांवर आमचे उमेदवार उभे करणार आहोत. याशिवाय चार राज्यांतील सर्व विधानसभा जागांवर पीएमएमएलचे उमेदवार असतील. या निवडणुकीत आपण मोठा विजय मिळवणार आहोत याची खात्री बाळगा. त्यामुळे प्रत्येक जागेवर आमचे उमेदवार असतील, असे पीएमएमएलचे प्रवक्ते तबिश कय्युम म्हणाले.

हाफिज सईदच्या ठावठिकाण्याबाबत द्विधा

हाफिज सईद सध्या तुऊंगात असल्याची माहिती आहे. मात्र, अनेक मीडिया रिपोर्ट्स आणि अगदी पाकिस्तानी पत्रकारांनीही सईद तुऊंगात नसून त्याच्या घरी असल्याचे उघड केले आहे. याचदरम्यान हाफिजचा पुत्र दहशतवादी कारवायांमध्ये सतर्क असल्याचेही समजते. दहशतवाद्यांची भरती आणि निधी गोळा करण्याव्यतिरिक्त, तलहा भारत आणि अफगाणिस्तानमधील भारतीय हितसंबंधांवर हल्ले करण्याची योजना आखत आहे. पाकिस्तानात त्याच्या हालचालींवर कोणतेही बंधन नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#international#social media
Next Article