महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हाफिज, अझहर, रहमान, सलाहुद्दीन भूमिगत

06:17 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकिस्तानी दहशतवाद्यांना सतावतेय ‘अज्ञातां’ची भीती

Advertisement

वृत्तसंस्था/ लाहोर

Advertisement

पाकिस्तानात लपून बसलेल्या भारताच्या टॉप मोस्ट वाँटेड दहशतवादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हत्येचे सत्र संपण्याची चिन्हे नाहीत. डिसेंबर महिन्यातच लष्कर-ए-तोयबाचे अनेक मोठे चेहरे संपले आहेत. यात ए ग्रेड दहशतवादी हबीबुललाह उर्फ भोला खानचा समावेश असून तो हाफिज सईदचा जवळचा नातलग देखील होता. तर हाजी उलमर गुल, अब्दुला शाहिन उर्फ ‘जिहादी गुरु’ यांचीही अज्ञातांकडून हत्या झाली आहे. पाकिस्तानात एकामागोमाग एक दहशतवाद्यांचा खात्मा होऊ लागल्याने विविध दहशतवादी संघटनांचे म्होरके भूमिगत झाले आहेत. यात हाफिज सईद, सैयद सलाहुद्दीन, मसूद अझहर, अब्दुल रहमान मक्की आणि जफर इक्बाल सामील आहे. या सर्वांना पाकिस्तानात सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे हे विशेष

एलईटीचा दहशतवादी हबीबुल्लाह उर्फ भोला खानवर अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. भोला खान हा लष्कर-ए-तोयबासाठी दहशतवाद्यांची भरती करत होता. तर एलईटीसाठी निधी जमविण्याची जबाबदारी हाजी उलमर गुलकडे होती. अज्ञात मारेकऱ्यांनी टँक येथे गुल आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना ठार केले आहे. यानंतर एलईटीचा टॉप ट्रेनर अब्दुल्ला शाहिनला मागील आठवड्यात कसूर येथे अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले आहे. शाहिनला दहशतवादी गटांमध्ये ‘जिहादी गुरु’ या नावाने ओळखले जात होते.

बदललेल्या स्थितीमुळे पाकिस्तानात आश्रय घेतलेले दहशतवादी जे स्वत:ला सुरक्षित मानत होते, ते आता भूमिगत झाले आहेत. पाकिस्तानात चालू वर्षात जैश-ए-मोहम्मद, डी कंपनी, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-जब्बर आणि लष्कर-आय-जांगवी समवेत अनेक दहशतवादी संघटनांमध्ये कार्यरत दहशतवादी मारले गेले आहेत.

हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सलाहुद्दीनला अमेरिकेने जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत सामील केले आहे. काही काळापासून सलाहुद्दीन हा भूमिगत आहे. पाकिस्तानात त्याला बुलेटप्रूफ वाहन आणि सुरक्षारक्षक पुरविण्यात आले आहेत. 1993 च्या मुंबईतील साखळी स्फोटांचा गुन्हेगार दाऊद इब्राहिमला कराचीत उच्चस्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. हाफिज सईद तसेच अब्दुल रहमान मक्की, जफर इक्बाल, मसूद अझहर यांना पूर्णवेळ सुरक्षा पुरविण्यात आली आहे.

आतापर्यंत मारले गेलेले दहशतवादी

पाकिस्तानच्या कराचीत अज्ञात हल्लेखोरांनी हंजला अदनानवर गोळ्या झाडल्या होत्या. अदनानचा मृत्यू हा  लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का होता. तर भारतविरोधक म्हणून ओळखला जाणारा मलिक असलम वजीरची एक स्फोट घडवून आणत हत्या करण्यात आली होती. वजीर हा स्वत:च्या प्रक्षोभक भाषणांद्वारे दहशतवाद्यांची भरती करत होता. मौलाना रहीम तारिक उल्ला याची 13 नोव्हेंबर रोजी कराचीत अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली होती. त्यापूर्वी हाफिजचा निकटवर्तीय अकरम खान उर्फ अकरम गाझीची बाजापूर येथे हत्या झाली होती.  त्याच्या काही दिवसांपूर्वी ख्वाजा शाहिद उर्फ मियां मुजाहिद मुजफ्फराबाद येथे मारला गेला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article