For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हडफडे सरपंच रोशन रेडकरची हकालपट्टी

01:13 PM Jan 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
हडफडे सरपंच रोशन रेडकरची हकालपट्टी
Advertisement

पंच, सरपंच म्हणून ठरला अपात्र : ‘बर्च’ला परवाने देणे अखेर भोवले 

Advertisement

पणजी : बर्च नाईट क्लब जळीत हत्याकांडप्रकरणी कोणत्याही कायदेशीर बाबी झालेल्या नसताना देखील हडफडे ग्रामपंचायतीने क्लबला जे परवाने दिले दिले त्याप्रकरणी सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने सरपंच रोशन रेडकर याच्या एकंदरीत कारभारावर ठपका ठेवला असून त्यामुळे सायंकाळी उशिरा राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार सरपंच रोशन याला अपात्र ठरविले आणि पदावरून मुक्त केले आहे. हडफडे येथे सहा डिसेंबर रोजी रात्री उशिरा बर्च नाईट क्लबला आग लागली आणि त्यामध्ये 25 जण जळून मरण पावले. या घटनेची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू झाली. तसेच भ्रष्टाचारी मार्गाने सदर क्लबला विविध प्रकारच्या परवानग्या मिळाल्या होत्या.

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य चौकशी समिती स्थापन केली या समितीने या घटनेची सखोल चौकशी केली आणि त्यानंतर आपला अहवाल सरकारला सादर केला. सरपंच रोशन रेडकर याला अपात्र ठरविण्यात यावे अशी मागणी हडफडे येतील काही ग्रामस्थांनी राज्य सरकारकडे केली होती. चौकशी समितीच्या शिफारशींनुसार पंचायतीचे सचिव बागकर याला अगोदर निलंबित करण्यात आले, नंतर सेवेतून निष्कासित करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा पंचायत संचालक आरोंदेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सरपंच रोशन रेडकर याला अपात्र घोषित करण्यात आले.  त्यांच्याकडचा पंचायतीचा अधिकार काढून घेतला आहे. पंच म्हणून देखील ते आता अपात्र ठरतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.