For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सडपातळ दिसण्यासाठी काढली हाडं

06:22 AM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
सडपातळ दिसण्यासाठी काढली हाडं
Advertisement

त्याच हाडांना शिजवून केले सूप

Advertisement

सुंदर दिसण्याच्या इच्छेपोटी माणूस काहीही करू शकतो. लोक लाखो-कोट्यावधींच्या ब्युटी ट्रीटमेंट्स करवितात. परंतु काही लोक त्याहून पुढे जात शरीरालाच स्वत:च्या मनानुसार बदलू पाहतात. असाच प्रकार एका महिलेने केला आहे. या महिलेने सडपातळ दिसण्यासाठी प्रथम स्वत:च्या शरीरातील काही हाडं काढली. या महिलेला सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे असल्याने तिने आणखी एक अजब कृत्य केले. तिने याच हाडांना शिजवून त्याद्वारे सूप तयार केले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडिओच्या अखेरीस ती हे सूप पितानाही दिसून येत आहे, यात तिने सूपची चव चिकनसारखी असल्याचे सांगितले आहे.

कॅनडाची एडिया डॅनियल एक इन्स्टाग्राम इन्फ्लुंएसर असून तिचे 4 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा मेकअप आणि पर्सनल लाइफशी निगडित व्हिडिओज पोस्ट करते. अलिकडेच तिचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून यात ती लोकांना एक सूप तयार करणे शिकवत आहे.  हा व्हिडिओ सामान्य सूपचा नव्हे तर स्वत:च्याच शरीराच्या हिस्स्याला शिजवून ती सूप तयार करत आहे.

Advertisement

तिने सडपातळ दिसण्यासाठी स्वत:च्या शरीरातील काही हाडं शस्त्रक्रियेद्वारे काढली होती. तिला स्वत:ची कंबर सडपातळ दिसावी असे वाटत होते. हाडं काढून घेतल्यावर तिने 6 महिन्यांपर्यंत त्यांना राखून ठेवले. एकेदिवशी तिने या हाडांना शिजवून त्याद्वारे सूप तयार करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारच्या सूपला बोन ब्रॉथ सूप म्हटले जाते. व्हिडिओत ती पाकिटातून हाडं बाहेर काढते आणि एका पॅनमध्ये टाकून पाण्यात शिजवू लागते. यातून तयार केलेले सूप ती पिते आणि ते चिकनप्रमाणे वाटत असल्याचे सांगताना यात दिसून येते. या व्हिडिओला 22 लाख ह्यूज मिळाले आहेत. तर अनेक लोकांनी कॉमेंट केली आहे.

Advertisement
Tags :

.