For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिमखाना - आनंद आज अंतिम लढत

12:13 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिमखाना   आनंद आज अंतिम लढत
Advertisement

मोहम्मद हमजा, ओजस गडकरी सामनावीर

Advertisement

बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित बालाजी चषक 16 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने केआर शेट्टी लायाज संघाचा 5 गड्यांनी तर आनंद क्रिकेट अकादमीने बेळगाव स्पोर्ट्स क्लबचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मोहम्मद हमजा, ओजस गडकरी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केआर शेट्टी लायाजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 111 धावा केल्या. हर्षजित बोकडेने 5 चौकारांसह 38, संग्राम पाटील व मदन यांनी प्रत्येकी 15 तर विहान शिंगाडेने 2 चौकारांसह 12 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे मोहम्मद हमजाने 19 धावात 3, तर विश्रृत कुंदरनाडने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमीने 18.3 षटकात 5 गडी बाद 113 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला.

पुरुषोत्तमने 4 चौकारांसह 33, अवनिश मालदकरने 2 चौकारांसह 15, विश्रृत कुंदरनाडने 13 तर मोहम्मद हमजाने 11 धावा केल्या. केआर शेट्टी लायाजतर्फे मंदार के. व ए. शिरोडकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 110 धावा केल्या. सचिन तलवारने 7 चौकारासह 58 धावा करून अर्धशतक झळकविले. श्रेयश पाटीलने 17, दक्षने 14 धावा केल्या. आनंदतर्फे श्लोक चडीचाल, आरुष जंगी, अर्णव पाटील व आयुष शेठ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमीने 19 षटकात 2 गडी बाद 111 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. ओजस गडकरीने 7 चौकारांसह 61 धावा करून अर्धशतक झळकविले. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे सोहम व श्लोक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.