For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत जिम मालकाची गोळ्या घालून हत्या

06:06 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत जिम मालकाची गोळ्या घालून हत्या
Advertisement

शूटरने 6-8 गोळ्या झाडल्या; सहा संशयितांना अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील सर्वात आलिशान क्षेत्रांपैकी एक असलेल्या ग्रेटर कैलास भागात एका जिम मालकाची गुऊवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना रात्री 10.45 च्या सुमारास घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांच्या शोधासाठी नाकाबंदी केली. तपासादरम्यान पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर रोहित गोदाराने त्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

Advertisement

35 वषीय नादिर शाह असे मृताचे नाव आहे. तो सीआर पार्कचा रहिवासी असून भागीदारीत जिम चालवत होता. त्याच्यावर दरोड्यासह चार गुन्हे दाखल आहेत. शूटरने जिम मालकावर सुमारे 6-8 गोळ्या झाडल्या. त्याला मॅक्स ऊग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. गँगस्टर रोहित गोदाराने सोशल मीडिया पोस्टद्वारे जिम मालकाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. नादिर हा तुऊंगात असलेला गुंड रोहित चौधरीच्या टोळीशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. रोहित चौधरी टोळी आणि लोरेश बिश्नोई टोळी एकमेकांचे विरोधी मानले जातात. या हत्याकांडात स्थानिक टोळीचाही संशय पोलिसांना आहे. स्थानिक पोलिसांसोबतच गुन्हे शाखा आणि स्पेशल सेलची टीमही हल्लेखोरांच्या शोधात व्यग्र आहेत.

Advertisement
Tags :

.