कुप्पटगिरीत इनरव्हील क्लबतर्फे ज्ञानदिंडीचे आयोजन
खानापूर : कुप्पटगिरी येथील मराठी प्राथमिक शाळेत खानापूर येथील इनरव्हील क्लबच्या माध्यमातून कामिका एकादशीचे औचित्य साधून ज्ञान दिंडीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा प्राचार्या शरयू कदम, सेक्रेटरी समृद्धी सुळकर उपस्थित होत्या. कार्यकमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी ज्ञान दिंडीने केली. दिंडीत विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या व्यक्तीरेखा साकारल्या. अभंग, भजन सादर केले. इनरव्हीलच्या माध्यमातून नमिता उप्पीन आणि स्मिता देऊळकर यांनी भक्तीगीत सादर केले. क्लबच्या अध्यक्षा प्रा. शरयू कदम यांनी क्लबचे सामाजिक, शैक्षणिक कार्य तसेच संतांच्या जीवनावर ज्ञानदिंडीचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर सामान्यज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस प्रदान केले. क्लबच्या माध्यमातून शाळेला भेटवस्तू दिली. कार्यक्रमाला शिक्षक एस. एस. हिरेमठ, एन. बी. कुप्पटगिरी, एस. वाय. कुंडेकर तसेच इनरव्हील क्लबचे सर्व पदाधिकारी, एसडीएमसी पदाधिकारी, गावकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. एस. कदम यांनी केले. सी. पी. पाटील यांनी आभार मानले.