घटस्फोटानंतर ग्वेनेथला झाले मोठे नुकसान
वेदनादायी अनुभव केले व्यक्त
हॉलिवूड अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रोने स्वत:चे खासगी आयुष्य आणि प्रोफेशनल आयुष्यावरून अनेक खुलासे केले आहेत. अभिनेता क्रिस मार्टिनपासून घटस्फोट घेतल्याच्या काही काळानंतर ग्वेनेथला एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. घटस्फोटानंतर मी एका चित्रपटातील भूमिका गमावल्याचे तिने सांगितले.
प्रसारमाध्यमांमध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. याचमुळे चित्रपटाशी संबंधित लोकांनी मला प्रोजेक्टमधून हटविण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटामुळे निर्माण झालेल्या स्थितुमळे चित्रपटासाठी गोष्टी अवघड ठरल्याचे निर्मात्यांचे म्हणणे होते असा दावा ग्वेनेथने केला आहे.
ग्वेनेथ पोल्ट्रो आणि क्रिस मार्टिनने 2014 मध्ये एक पोस्ट करत विभक्त होण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घटस्फोटाबद्दल मोठी चर्चा झाली होती. लोकांनी माझ्या घटस्फोटाच्या वृत्तावर इतक्या प्रतिक्रिया का दिल्या होत्या हे आता मला समजत आहे. अनेक लोक अशा कहाण्यांना स्वत:च्या वेदनादायक अनुभवांशी जोडत असल्याचे तिने म्हटले आहे.
ग्वेनेथ सध्या ‘मार्टी सुप्रीम’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. तिच्या या चित्रपटाची निर्मिती ए24 कंपनीने केली आहे. चित्रपटात तिच्यासोबत टिमोथी चालमेट, ओडेसा एजियन आणि केविन ओलीरी हे कलाकार दिसून येणार आहेत.