महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गयाना : पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत

06:45 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय वंशाच्या लोकांकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन, अनेक मान्यवरांची उपस्थिती

Advertisement

वृत्तसंस्था / जॉर्जटाऊन

Advertisement

नायजेरिया आणि ब्राझील या देशांचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गयाना या दक्षिण अमेरिकेतील देशात आगमन झाले आहे. या देशातील भारतीय वंशाच्या लोकांनी त्यांचे बुधवारी भव्य स्वागत केले. त्यांच्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नागरीकांचे आणि उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले.

गयाना या देशाला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे गेल्या 50 वर्षांमधील प्रथम सर्वोच्च नेते ठरले आहेत. गयाना या देशात भारतीय वंशाचे 3 लाख 20 हजारांहून अधिक लोक आहेत. त्यांच्यापैकी बहुतेक जणांचे पूर्वज 180 वर्षांपूर्वी या देशात स्थायिक झाले होते. त्यांना ब्रिटीशांनी या देशात आणले होते. उसाची शेती आणि अन्य कामांसाठी त्यांना भारतातून येथे आणण्यात आले होते.

भारतीय वंशाच्या नागरीकांचे कौतुक

अनेक दशकांपूर्वी भारतातून येथे येऊन स्थायिक झालेल्या लोकांचे भारतावरचे प्रेम आजही तितकेच आहे, हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे. मायदेशापासून आपण कितीही अंतरावर असलो तरी आपण आपली मूळ कधी विसरत नाही, याचा प्रत्यय आज मला येत आहे. गयानाच्या विकासात येथील भारतीय वंशाच्या नागरीकांचे मोठे योगदान आहे. त्यांनी या देशात भारताची मान उंचावली आहे, अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधताना केली.

  

पारंपरिक वेषभूषा, हाती तिरंगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आयोजित विशेष कार्यक्रमाला येथील भारतीय वंशाचे नागरीक पारंपरिक भारतीय वेषभूषेत आलेले होते. त्यांच्यापैकी अनेकांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज हाती धरलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यात मिसळून त्यांच्याशी संवाद साधला. गयानातील एका भारतीय वंशाच्या चित्रकाराने चितारलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र त्यांना भेट म्हणून देण्यात आले. उपस्थितांनी भारताचा आणि त्यांच्या नावाचा जयघोष करुन त्यांचे स्वागत केले.

विमानतळावर भव्य स्वागत

भारतीय वंशाच्या नागरीकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य स्वागत जॉर्जटाऊनच्या विमातनळावर करण्यात आले. गयानाचे नेते मोहम्मद इर्फान अली आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ यावेळी उपस्थित होते. या स्वागत कार्यक्रमानंतर ते आपल्या वास्तव्याच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांचे स्वागत ग्रेनेडाचे सर्वोच्च नेते डिकन मिचेल आणि बार्बाडोसचे नेते मिया अमूर मोटली या नेत्यांकडून करण्यात आले. गयानाचे नेते मार्क अँथोनी फिलिप्स हेही विमानतळावरील स्वागत कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले होते.

आज भारतात परतणार

नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांचा चार दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुरुवारी भारतात परतत आहेत. त्यांचे या तीन्ही देशांचे दौरे भारतासाठी अत्यंत सकारात्मक आणि यशस्वी ठरले आहेत. विशेषत: जी-20 शिखर परिषदेतील त्यांचे मतप्रदर्शन मार्गदर्शक ठरले अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने बुधवारी पत्रकारांना दिली आहे.

जॉर्जटाऊनचा सर्वोच्च सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाची राजधानी जॉर्जटाऊन या शहराचा सर्वोच्च सन्मान ‘की टू दी सिटी ऑफ जॉर्जटाऊन’ हा प्रदान करण्यात आला. अत्यंत कमी विदेशी नेत्यांचा असा सन्मान करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. हा सन्मान त्यांना हॉटेलमधील कार्यक्रमात जॉर्जटाऊनचे महापौर अल्फ्रेड मेंटॉर यांच्या हस्ते बुधवारी सकाळी प्रदान करण्यात आला आहे.

दौरा यशस्वी झाल्याचे प्रतिपादन

ड नायजेरिया, ब्राझील, गयाना देशांचा दौरा यशस्वी झाल्याचे भारताचे प्रतिपादन

ड गयानाची राजधानी जॉर्जटाऊनचा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान मोदी यांना प्रदान

ड ब्राझीलच्या जी-20 परिषदेतील पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची सर्वत्र चर्चा

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article